मुंबई । क्रिकेटच्या मैदानावर चेंडू लागल्याने काही क्रिकेटपटूचा दुर्दैवी अंत झाल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. तर काही खेळाडूंना मैदानाच्या बाहेर अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. इंग्लंडचा तेवीस वर्षीय क्रिकेटपटूचा देखील अशाच दुर्दैवी घटनेत अंत झाला. पोलिसांच्या कारवाईपासून स्वत:ला वाचवित असताना काही वेळातच त्याचा अपघातात मृत्यू झाला.
टॉम मेनार्ड असं या खेळाडूचं नाव आहे. तो सरे क्रिकेट कल्बकडून खेळत होता. मेनार्ड 2012 साली लंडन पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी रस्त्यावरून वेगात गाडी चालवत होता. अचानक विम्बल्डन रेल्वे स्टेशनच्या जवळ त्याला करंट लागला आणि रेल्वे आपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
18 जून 2012 ला मेनार्ड हा आपली मर्सिडीज गाडी घेऊन चुकीच्या दिशेने गाडी चालवत होता, तेव्हा पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तो चांगलाच घाबरला आणि पोलिसांच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी वेगाने गाडी चालू लागला. तो पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी झाला.
त्यानंतर पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी मेनार्डचा रेल्वे ट्रकजवळ मृतदेह आढळून आला. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार मेनार्डने प्रमाणाबाहेर मद्यप्राशन केले होते. याशिवाय त्याच्या शरीरात कोकेनही सापडले होते.
इंग्लंडचा वनडे आणि टी20 स्पेशलिस्ट सलामीचा फलंदाज जेसन रॉय आणि टॉम मेनार्ड यांच्यात चांगली मैत्री होती. मेनार्डचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर जेसन रॉयला चांगलाच धक्का बसला. तो मानसिक तणावाखाली देखील गेला होता. त्याने क्रिकेट खेळणे सोडून देण्याचा विचार केला होता. पुढे काही वर्षांनंतर तो या मानसिक दबावातून बाहेर आला. रॉयने त्याच्या हातावर मेनार्डच्या स्मरणार्थ एक टॅट्यू देखील काढला आहे.
https://www.instagram.com/p/MvTvTsN0GY/
मेनार्डने प्रथम श्रेणीच्या 48 सामन्यात 32 च्या सरासरीने 2384 धावा केल्या. यात चार शतके ठोकली आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
सोबर्स, बॉथम, कपिल देव यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत सामील झाला बेन स्टोक्स
गांगुली म्हणतो; मला धोनीकडून अशी अपेक्षा नव्हती, त्यादिवशी तो वेगळाच वागला
चाहत्यांनी दादाचा वाढदिवस केला खास अंदाजात साजरा; पाहून व्हाल थक्क