युरोपमध्ये चालू असलेल्या युरो कप २०२० अंतिम टप्प्यात आला आहे. बुधवारी (०७ जुलै) वेम्बली येथे इंग्लंड आणि डेन्मार्क यांच्यात युरो कपचा दुसरा उपांत्य फेरी सामना पार पडला. कर्णधार हॅरी केनच्या निर्णायक गोलमुळे इंग्लंड संघाने डेन्मार्कला २-१ ने पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. यासह तब्बल ५५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इंग्लंड अंतिम फेरी खेळणार आहे. मात्र, इंग्लंडच्या या विजयावर आता मोठा वाद निर्माण झाला असून, त्यावर फुटबॉल विश्वातील अनेक दिग्गजांनी प्रतिक्रिया दिली.
इंग्लंडचा अंतिम फेरीत प्रवेश
वेम्बली स्टेडियमवर युरो कप २०२० च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड आणि डेन्मार्क आमने सामने आले. डेन्मार्कच्या, मिकेल डेम्सगार्डने ३० व्या मिनिटाला अप्रतिम फ्रि-किकद्वारे गोल करून संघाला आघाडीवर नेले. मात्र, त्यानंतर ९ मिनिटांनी इंग्लंडच्या खेळाडूंनी अप्रतिम चाल रचत गोल करण्याचा प्रयत्न केला.
परंतु, डेन्मार्कचा कर्णधार सायमन केजर याच्या पायाला चेंडू लागून आत्मघाती गोल झाला व सामना बरोबरीत आला. त्यानंतर, पूर्ण वेळेतही बरोबरी कायम राहिली. एक्स्ट्रा टाइममध्ये १०४ व्या मिनिटाला मिळालेली पेनल्टी पहिल्या प्रयत्नात सत्कारणी लावण्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनला अपयश आले. मात्र, त्याने साऊंड वर गोल करत संघाला विजयाच्या नजिक नेले. त्यानंतर एकही गोल न झाल्याने इंग्लंडने अंतिम फेरीत प्रवेश केला.
त्या गोलमुळे सुरु झाला वाद
या सामन्यात निर्णायक ठरलेल्या हॅरी केनच्या गोलमुळे आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन हा पेनल्टीवर गोल करण्यात अपयशी ठरला. मात्र, त्यानंतर डेन्मार्कचा गोलकीपर कॅश्पर श्मायकलच्या हातून सुटलेल्या चेंडूवर त्याने रिबाऊंडद्वारे गोल करत संघाला अंतिम फेरीत नेले.
नेमक्या याच क्षणांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये श्मायकल पेनल्टी थोपविण्यासाठी सज्ज होत असताना इंग्लंडचे चाहते त्याच्या डोळ्यांवर हिरवा लेझर मारताना दिसून आले. या परिस्थितीतही त्याने पेनल्टी अडवली. परंतु, तो रिबाऊंडवर गोल होण्यापासून रोखू शकला नाही.
https://www.youtube.com/watch?v=LBfIO-pHtSw
दिग्गजांनी व्यक्त केली नाराजी
इंग्लंडच्या प्रेक्षकांनी केलेल्या या कृत्याबद्दल प्रसिद्ध फुटबॉल मॅनेजर आर्सन वेंगर व होजे मॉरीन्हो यांनी इतक्या मोठ्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अशा प्रकारची घटना होते यावर निराशा व्यक्त केली. इंग्लंडचा स्ट्रायकर स्टॅन कॉलीमोर याने इंग्लिश प्रेक्षकांना याबाबत सुनावले.
महत्त्वाच्या बातम्या –
जिद्द असावी तर अशी! पायातून रक्त वाहत असतानाही मेस्सीने संघाला मिळवून दिले अंतिम फेरीचे तिकीट
राहुलने सलामीला ५ शतके ठोकलीत, तरीही त्याला खाली खेळवण्याचा अट्टाहास का? दिग्गजाचा मोठा प्रश्न
इंग्लंडमध्ये भारतीय संघाला भोवते सलामीवीरांचे अपयश, ‘ही’ आहे २० वर्षातील सर्वात यशस्वी जोडी