टी-20 विश्वचषक अभियानाची सुरुवात करण्यापूर्वी इंग्लंड संघाला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिस टोप्ले सध्या चांगल्या फॉर्ममध्ये होता, पण दुखापतीच्या कारणास्तव त्याला टी-20 वश्वचषक 2022 मध्ये खेळता येणार नाहीये. त्याने या महत्वाच्या स्पर्धेतून माघार दुखापतीमुळे माघार घेतली आहे. इंग्लंड संघ आणि चाहत्यांसाठी ही खूपच निराशाजनक बातमी आहे.
रीस टोप्ले (Reece Topley) याला इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सराव सामन्यापूर्वी ही दुखापत झाली होती. सामना सुरू होण्याआधी सीमारेषेजवर त्याचा पाय मुडपला होता, ज्यामुळे ही दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. दुखापतीनंतर देखील त्याने या सामन्यात खेळण्याचा निर्णय घेतला, पण गोलंदाजी मात्र केली नाही. आता तो संपूर्ण टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे.
इंग्लंडने अद्याप रिस टोप्लेच्या बदली खेळाडूची घोषणा केली नाहीये. टायमल मिल्स () किंवा रिचर्ड ग्लेसन () रिस टोप्लेची जागा घेण्यासाठी प्रमुख दावेदार आहेत. बदली खेळाडू जरी संघात आला, तरी टोप्लेची कमी भरण्यासाठी तो पुरेसे योगदान देईल, अशी शक्यता कामीच आहे. टोप्लेचे या संपूर्ण वर्षातील प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे.
टोप्लेचे या संपूर्ण वर्षातील प्रदर्शन जबरदस्त –
यावर्षी भारत आणि इंग्लंड यांत्यात द्विपक्षीय मालिका खेळली गेली. या मालिकेत रिस टोप्ले चर्चेचा विषय ठरला. त्याने या मालिकेत उत्कृष्ट गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. भारताविरुद्ध खेळलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टोप्लेने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. या विकेट्स त्याने फक्त 24 धावा खर्च करून घेतल्या. इंग्लंड क्रिकेट संघाच्या इतिहासातील हे एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन ठरले. यापूर्वी इंग्लंडसाठी पॉल कोलिंगवुडने बांगलादेशविरुद्ध 31 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या होत्या. आता कोलिंगवुड आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर टोप्लेने द हंड्रेड स्पर्धेतूनही माघार घेतली होती. त्याने द हंड्रेडच्या मागच्या हंगामातील सुरुवातीचे काही सामने खेळल्यानंतकर माघार घेतली होती. असे असले तरी, त्याला विश्वचषकाच्या तोंडावर दुखापत झाली आणि या स्पर्धेत आता तो खेळणार नाहीये. इंग्लंडला विश्वचषकातील पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध 22 ऑक्टोबर रोजी खेळायचा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
माजी प्रशिक्षकांनी गायले मोहम्मद शमीचे गुणगाण; म्हणाले ‘शाहीन आफ्रिदीपेक्षा…’
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध न्यूझीलंड सराव सामना? एका क्लीकवर मिळवा सगळी माहिती