नुकताच आयपीएलचा लिलाव कोचिन येथे पार पडला. आयपीएलच्या या मिनी लिलावात इंग्लंडच्या खेळाडूंचा बोलबाला राहिला. प्रत्येक फ्रेंचायझी संघाची या खेळाडूंना आपल्या संघात सामील करुन घेण्यासाठी चढाओढ सुरु होती. इंग्लंडच्या सॅम करन याने या मिनी लिलावात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू होण्याचा मान मिळवत विक्रमाची नोंद केली. पंजाब किंग्ज या संघाने त्याला 18.5 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात सामील केले. 2022मध्ये इंग्लंड संघाने सर्व ठिकाणी मैदान गाजवले त्यामुळे त्यांच्या खेळाडूंना आयपीएल स्पर्धेत इतका भाव मिळाला. चला तर मग पाहुयात इंग्लंडने 2022 या वर्षात केलेली कामगिरी.
भारताला कसोटी सामन्यात केले पराभूत
2022मध्ये इंग्लंड आणि भारत या संघात कसोटी सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. एजबेस्टनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने 7 गडी राखून भारतावर विजय मिळवला.
पाकिस्तानला त्यांंच्याच घरात दिली मात
इंग्लंड संघाने पाकिस्तानला आधी 7 टी20 सामन्यांच्या मालिकेत पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या या टी20 मालिकेत इंग्लंडने 4-3ने ही मालिका जिंकली होती. त्यानंतर या संघांमध्ये इंग्लंडचा कसोटी संघ पाकिस्तानमध्ये दौऱ्यासाठी गेलेला. या मालिकेत इंग्लंडने 3-0ने ऐतिहासिक विजय मिळवला.
टी20 विश्वचषक जिंकला
यावर्षी टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये खेळला गेला. हा विश्वचषक इंग्लंडने आपल्या नावावर केला. धमाकेदार फॉर्ममध्ये असणाऱ्या इंग्लंड संघाने उपांत्यफेरीत भारताचा 10 विकेट्सने लाजीरवाणा पराभव केला होता. त्यानंतर अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत विश्वचषक जिंकला.
आयपीएलच्या लिलावात इंग्लिश खेळाडूंचे वर्चस्व
आयपीएल 2023 स्पर्धेसाठी आयोजित केलेल्या मिनी लिलावामध्ये इंग्लिश खेळाडूंचे वर्चस्व राहिले. सॅम करन याला पंजाब किंग्ज संघाने 18.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. सॅम करन आयपीएलच्या इतिहासात विकला गेलेला सर्वात महागडा खेळाडू ठरला. याशिवाय इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याला देखील या लिलावात चेन्नई सुपर किंग्ज संघाने 16.25 कोटी रुपयांमध्ये खरेदी करत आपल्या संघात सामील केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफलातून! त्रिफळा उडताच फलंदाज 5 सेकंदासाठी बनला पुतळा, ऑस्ट्रेलियन लीगमधील व्हिडिओ व्हायरल
विराटला ज्या प्रशिक्षकाने दिले फलंदाजीचे धडे, त्यानेच केली आगपाखड; म्हणाला, ‘हे अस्वीकार्य…’






