इंग्लंडचा वेगवाान गोलंदाज टायमल मिल्स याने सध्या सुरु असलेल्या बिग बॅश लीगमधून आपले नाव मागे घेतले. मिल्स याला आपल्या दोन वर्षांच्या मुलीच्या अचानक उद्भवलेल्या आजारपणामुळे बीबीएलमधून माघार घ्यावी लागली. मिल्स हा 2022च्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता आणि आता आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये सहभाग नोंदवणार आहे. या हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघाने त्याला रिटेन केले नव्हते. 30 वर्षीय मिल्स हा बीबीएलमध्ये गतविजेत्या पर्थ स्कॉचर्स संघाचा भाग होता. मात्र, त्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली, ज्यात तो आपल्या मुलीसोबत दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CmbJa0Dsj9K/?utm_source=ig_web_copy_link
मुंबई इंडियन्सच्या टायमल मिल्स (Tymal Mills) इंस्टाग्रावर मुलीसोबतचा फोटा शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “11 दिवसांचा अवघड काळ काढल्यानंतर ख्रिसमससाठी घरी जात आहोत. जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी एअरपोर्टवर होतो, तेव्हा मला माझ्या मुलीच्या आजारपणाबद्दल समजले. पुढे जाऊन समजले की, तिला स्ट्रोक आला आहे. तिने तिच्या डाव्या बाजूवरचे नियंत्रण गमावले आहे. आम्हाला माहिती नव्हते की ती किती प्रमाणात बरी होऊ शकेल. ज्या परिस्थिततीतून ती गेली आहेे, तिच्या रिकव्हरीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. तिने या काळात रिहॅब, मेडिकेशन आणि स्कॅन या गोष्टी सहन केल्या. आता आम्ही ज्याठिकाणी आहोत, त्यासाठी आभारी आहोत.”
आयपीएल 2022च्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने 1.5 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यावेळी मिल्सची बेस प्राईझ 1 कोटी रुपये इतकी होती. इंग्लंडच्या बेन स्टोक्स, सॅम करन आणि आदिल रशिद यांसारखे मोठे खेळाडू देखील आयपीएलमध्ये सहभाग नोंदवला असून त्यांची बेस प्राईझ 2 कोटी रुपये इतकी आहे. त्याने खेळलेल्या 13 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 13 विकेट घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे त्याच्यापेक्षा बॉलर बरे, धावा तरी करतील! केएल राहुल चाहत्यांकडून ट्रोल
IPL Auction 2023: मागील लिलावापेक्षा यंदाच्या खर्चात 350 कोटी रुपयांची कपात! जाणून घ्या कारण