इंग्लंड पुरूष क्रिकेट संघ तब्बल 17 वर्षानंतर पाकिस्तानचा दौरा करत आहे. या दौऱ्यात तीन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. त्यातील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळला जात आहे. याची सुरूवात गुरूवारी (1 डिसेंबर) झाली. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात इंग्लंडच्या डावाची सुरूवात जोरदार झाली. सलामीवीर झॅक क्राऊले आणि बेन डकेट यांनी शतकी खेळी करत भारताचे माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याचबरोबर भारताचा मोठा विक्रमही मोडला आहे.
झॅक क्राऊले (Zak Crawley) आणि बेन डकेट (Ben Duckett) या दोघांनी ज्याप्रकारे डावाची सुरूवात केली ते पाहून दोघे कसोटी खेळत आहेत की टी20 हा प्रश्न सर्वांना पडला. दोघांच्या या अप्रतिम खेळीमुळे इंग्लंडने पहिल्या सत्रात विश्वविक्रमी धावसंख्या उभारली. इंग्लंडने पहिल्या सत्रात 27 षटकांत 174 धावा केल्या. हा विक्रम याआधी भारताच्या नावावर होता. भारताने 2018मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध एकही विकेट न गमावता 158 धावसंख्या उभारली होती.
Our openers made records tumble today ????
Scorecard: https://t.co/BFoHVZyDak
???????? #PAKvENG ???????????????????????????? pic.twitter.com/ZwHuRv4Z2v
— England Cricket (@englandcricket) December 1, 2022
त्याचबरोबर पाकिस्तान दौऱ्यावर येणाऱ्या कोणत्याही संघातील सलामीवीरांनी कसोटीच्या पहिल्या डावात शतकी खेळी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2006मध्ये वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी अशी कामगिरी केली होती. त्यांनी 13 ते 17 जानेवारी, 2006मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात सेहवागने 254 धावा आणि द्रविडने नाबाद 128 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात भारताने पहिला डाव एक विकेट गमावत 410वर घोषित केला होता. दुसरीकडे पाकिस्तानने पहिल्या डावात 7 विकेट्स गमावत 679 धावसंख्येवर डाव घोषित केला होता आणि तो सामना अनिर्णीत राहिला. Opener of the opposition team who scored a Test century on the tour of Pakistan
A beautiful innings, @OPope32!! ????????
Our third hundred of the day!
ScorecardL https://t.co/qEA63s9D3Y
???????? #PAKvENG ???????????????????????????? pic.twitter.com/lI3Ac0HTHy
— England Cricket (@englandcricket) December 1, 2022
पाकिस्तानविरुद्ध क्रॉउलीने 111 चेंडूत 21 चौकरांच्या मदतीने 122 धावा केल्या होत्या, तर बेन डकेट हा 110 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने 107 धावा केल्या. शतक झळकावल्यानंतर दोन्ही फलंदाज बाद झाले. त्यानंतर ओली पोप (Ollie Pope) यानेही शतकी खेळी करत संघाला 450च्या पार नेले. ENGvPAK Test Zack Crawley-Ben Duckett century The stormy batting of both of them broke many records of India
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित, विराटबरोबर टीम इंडिया लवकरच बांगलादेशला पोहोचणार; जाणून घ्या संघ आणि वेळापत्रक एकाच क्लिकवर
वेस्ट इंडिजविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा 57 वर्षाचा भन्नाट योगायोग! स्मिथ, लॅब्युशेनने पाडला धावांंचा पाऊस





