---Advertisement---

भारताविरुद्ध खेळण्यापूर्वी इंग्लंडने केले ‘या’ तीन खेळाडूंना संघाबाहेर, वाचा नेमके काय झाले ते

On: शुक्रवार, जुलै 15, 2022 9:03 PM
England ODI Team
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात होणारा तिसरा वनडे सामना रविवारी (१७ जुलै) खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत दोन्ही संघ एक-एक सामना जिंकले आहेत. यामुळे ही मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे. हा निर्णायक सामना मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्डवर खेळला जाणार आहे.  या सामन्याआधी इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डने मोठा निर्णय घेतला आहे.

इंग्लंड संघाने टी२० ब्लास्टच्या अंतिम सामन्यासाठी हॅरी ब्रुक, फिलीप सॉल्ट आणि मॅथ्यू पार्किंसन यांना संघातून मुक्त केले आहे. ते तिन्ही खेळाडू भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात सहभागी झाले होते. ते टी२० ब्लास्टमध्ये संघाचा भाग असल्याने त्यांचे संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. यामुळे इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डने हा निर्णय घेतला आहे.

या मालिकेत ब्रुक, सॉल्ट आणि पार्किंसन हे तिघेही संघात परतणार आहेत. ते टी२० ब्लास्टचा अंतिम सामना झाल्यानंतर इंग्लंड संघामध्ये पुन्हा खेळणार आहेत. यामुळे भारता विरुद्ध ते तिसऱ्या वनडे सामन्यासाठी इंग्लंडच्या अंतिम अकरामध्ये असण्याची शक्यता आहे. तसेच टी२० ब्लास्टचा सामना संपल्यानंतर १२ तासांनी वनडे सामना सुरू होणार आहे. या लीगचा उपांत्य फेरीचा आणि अंतिम सामना एकाच दिवशी खेळला जाणार आहे.

या तीन खेळाडूंबाबत इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डने म्हटले, “हे तिघेही जण त्यांच्या-त्यांच्या काउंटी क्लबमध्ये सहभागी होण्यासाठी एजबस्टनला रवाणा होणार आहे. त्यानंतर रविवारी होणाऱ्या सामन्यासाठी पुन्हा इंग्लंड संघाशी जोडले जाणार आहे.”

या टी२० लीगमध्ये  इंग्लंडच्या संघातील काही नियमित खेळाडूंचाही सहभाग आहे. मात्र त्या सहा खेळाडू टी२० ब्लास्टच्या अंतिम सामन्यात सहभागी होण्याची परवाणगी बोर्डने दिलेली नाही. लंकाशायरचे जोस बटलर (Jos Buttler) आणि लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone), यार्कशायरचा जॉनी बेयरस्टो (Johnny Bairstow), जो रुट (Joe Root)आणि डेविड विले, समरसेटचा क्रेग ओव्हरटन यांचा त्यात समावेश आहे.

टी२० ब्लास्टचा उपांत्य फेरीचा पहिला सामना, दुसरा सामना आणि अंतिम सामना शनिवारी (१६ जुलै) खेळला जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

ललित मोदींचे ९ वर्षांपूर्वीचे ट्वीट होतेय व्हायरल, सुष्मिता सेनला सर्वांपुढे बोलले होते असे काही

कसोटीत अव्वल तर वनडे, टी२० ठरतोय फेल, ‘या’ खेळाडूबाबत कॅप्टन शर्मा घेणार मोठा निर्णय

विश्वचषक विजेत्या खेळाडूंनी ज्या मैदानावर घेतले क्रिकेटचे धडे, त्यालाच ठोकले ताळे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---