इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला आहे. तीन सामन्यांची ही मालिका बरोबरीत असल्याने रविवारी (१७ जुलै) होणारा तिसरा सामना चुरशीचा होणार आहे. लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताचा १०० धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. या सामन्यात भारताचे गोलंदाज तर चमकले मात्र फलंदाजांनी मोठी निराशा केली आहे. यामुळे भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा तिसऱ्या सामन्यासाठी संघात बदल करण्याची शक्यता आहे.
या मालिकेत भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) धावा काढण्यात अपयशी ठरला आहे. तसेच त्याची मागील मर्यादित षटकातील कामगिरी पाहता त्याला धावा करण्यात अपयश आले आहे. मात्र तो कसोटीमध्ये चमकला आहे. मॅनचेस्टर येथे होणारा इंग्लंड विरुद्धचा तिसरा सामना मालिकाविजयासाठी महत्वाचा असल्याने रोहित पंतला वगळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याला पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण दुसऱ्या सामन्यात त्याला भोपळा न फोडताही बाद झाला होता.
पंतच्या बाद होण्याने रोहितच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. तो बाद झाला की भारताची मधली फळी पार कोलमडत असल्याने संघ अडचणीत येत आहे. तर पंतच्या ऐवजी इशान किशन (Ishan Kishan) याला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याने मागील मर्यादित षटकाच्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच तो सलामीला येत तुफानी फलंदाजी करण्यातही मातब्बर असल्याने त्याची तिसऱ्या वनडेसाठी संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
पंत हा कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सामना विजयात महत्वाचा शिलेदार ठरला आहे. मात्र त्याची वनडे आणि टी२० यांमधील कामगिरी पाहिली असता तो धावा काढण्यात अपयशी ठरत आहे. तो सर्वाधिक वेळ फलंदाजी करण्यात खेळपट्टीवर टिकतही नाही. यामुळे धावसंख्सेत मोठा फरक पडत आहे. मात्र त्याने यष्टीरक्षण उत्तम केले आहे.
पंतने ३१ कसोटीमध्ये ४३.३३च्या सरासरीने २१२३ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. तर २६ वनडे सामन्यात ३१.०९च्या सरासरीने ७१५ धावा केल्या असून यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ८५ राहिली आहे. टी२०मध्येही त्याची सरासरी २३च्या आसपास आहे. तसेच त्याची वेस्ट इंडिज दौऱ्यातील ५ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
समोर आले टीम इंडियाच्या निवडप्रक्रियेचे सत्य, ‘त्यामुळे’ विराट झालाय वेस्ट इंडीज दौऱ्यातून बाहेर
विश्वचषक विजेत्या खेळाडूंनी ज्या मैदानावर घेतले क्रिकेटचे धडे, त्यालाच ठोकले ताळे
काय ती स्टाईल, काय तो ऍटिट्यूड! विराट कोहलीचा लॉर्ड्सच्या मैदानावर जातानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल






