इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारतीय संघ पहिल्या दिवसापासून पिछाडीवर होता. ज्यामुळे भारतीय संघाने हा सामना एक डाव आणि ७६ धावांनी गमावला. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ओवल कसोटी सामन्यासाठी संघात बदल होण्याचे संकेत दिले आहे.
सामन्यानंतर विराट कोहली याबाबत म्हणाला, “संघात आम्ही काही बदल करण्यात बाबत विचार करत आहोत. एवढ्या मोठ्या मालिकेत आपण खेळाडूंकडून सलग ४ कसोटी सामने खेळण्यासाठी जोर देऊ शकत नाही.”
तसेच भारतीय संघाने तिसरा कसोटी सामना गमावल्यानंतर कोहली म्हणाला, “हे सगळे समोर असलेल्या धावसंख्येमुळे झाले. आम्हाला माहीत होते, की आम्ही ७८ धावांवर सर्वबाद झालो होतो. त्यामुळे आम्ही आधीच या सामन्यात पिछाडीवर होतो. यानंतर विरोधी संघाने मोठी धावसंख्या उभी केली. यानंतर आम्ही तिसऱ्या दिवशी काही महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि पुढच्या दिवसाबद्दल विचार करत होतो. मात्र चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला इंग्लिश गोलंदाजांनी दमदार खेळी केली यामुळे आमच्यावरील दबाव वाढला.”
“तसेच आम्ही गोलंदाजीत देखील कमाल करू शकलो नाही. इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना परिस्थिती कधीही बदलू शकते. खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक होती. मात्र, इंग्लंडने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. ज्यामुळे आमच्याकडून फलंदाजी करतेवेळी काही चुका झाल्या.”
“याचा परिणाम आम्हाला आमच्या विकेट गमवाव्या लागल्या. ज्यावेळी इंग्लंड फलंदाजीसाठी आला, तेव्हा खेळपट्टी जास्त बदललेली नव्हती. त्यामुळे त्यांनी फलंदाजी करताना चांगला फायदा घेतला आणि काही उत्कृष्ट निर्णय देखील घेतले. खरे सांगायचे झाले तर हा सामना इंग्लंडच्याच नावे होता,” असेही कोहली म्हणाला.
पुढील सामन्यात आणखी एका फिरकीपटूला संघात सामील करण्याबाबत विचारले असता कोहली म्हणाला, “अतिरिक्त फिरकीपटूला खेळवणे हे खेळपट्टीवर अवलंबून असेल आणि यावर आम्ही नंतर विचार करु. हे सगळे खेळपट्टीवर अवलंबून आहे की खेळ पाचव्या दिवसापर्यंत कसा राहील.”
दरम्यान, इंग्लंडच्या भारतावरील एक डाव आणि ७६ धावांच्या विजयानंतर इंग्लंडने या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. आता या मालिकेतील पुढचा कसोटी सामना केंनिंग्टन ओव्हलच्या मैदानावर २ सप्टेंबरपासून खेळविण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–ओव्हल कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल, कर्णधार कोहलीचे संकेत
–ऍशेस २०२१-२२ वर प्रश्नचिन्ह; मालिकेपूर्वी ‘या’ कारणामुळे इंग्लंडचे १० खेळाडू घेऊ शकतात माघार
–दुसऱ्यांदा विराटला नडला इंग्लंड संघ; लॉर्ड्सनंतर लीड्समध्ये विद्यमान भारतीय कर्णधाराविरुद्ध केला ‘हा’ पराक्रम





