भारतीय संघ एजबस्टन कसोटी सामन्यात पराभूत झाला याचा अनेकांना धक्का बसला आहे. इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) बर्मिंघम येथे झालेल्या या पाचव्या सामन्यात भारताला ७ विकेट्सने पराभूत व्हावे लागले. यामुळे भारताला २-२ असे बरोबरीत समाधान मानावे लागले. या पराभवाने भारताच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा देखील समावेश आहे. त्यांनी भारतीय खेळाडूंच्या देहबोलीवर आणि खेळण्याच्या कौशल्यावर प्रश्न निर्माण केले आहेत.
शास्त्री यांनी इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात झालेल्या कसोटी सामन्याचे समालोचन केले होते. ते जेव्हा भारताचे मुख्य प्रशिक्षक होते तेव्हा भारताने या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. त्यांच्या प्रशिक्षणाचा कालखंड संपल्याने राहुल द्रविड (Rahul Dravid) हे भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रुजू झाले.
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ पहिले तीन दिवस चांगले वर्चस्व गाजवत होता. नंतरच्या दोन दिवसांमध्ये जे घडले ते एका वाईट घटनेसारखे झाले असे मत काहींनी व्यक्त केले आहेत. या सामन्यात भारतीय खेळाडूंच्या खेळीवर अनेक दिग्गज भारतीयांनी प्रश्न निर्माण केले आहेत.
शास्त्री यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक पद ७ वर्षे सांभाळले आहे. ‘या काळात मी फार धनी झालो. इथे मी पैश्याची नाही तर संघासोबत मिळालेल्या अनुभवाबाबत बोलत आहे’, असे विधान त्यांनी केले आहे. समालोचन करताना काही जण त्यांना नेहमी एक प्रश्न विचारत होते तो म्हणजे, तुम्ही प्रशिक्षक होता तेव्हा भारताला या कसोटीमध्ये २-१ने आघाडी मिळाली. ते म्हणत, “सगळे काही ठीक झाले तर संघाने मालिका जिंकावी, जर ते जिंकले तर उत्तम होईल. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली हा विजय एक औपचारिकताच राहिला आहे,” असे शास्त्री यांनी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हटले होते.
एजबस्टन कसोटीमध्ये शेवटच्या दोन दिवसाच सामन्याची बाजू पूर्णपणे बदलेली दिसली. यावेळी शास्त्री यांचे मन आणि विचार दोन्ही वेगळी होती. ते सामना संपल्यावर रागात दिसत होते. ते स्वत: पुढे येत म्हणाले, “सामना पराभूत झालो त्याचे एवढे दु:ख नाही झाले, मात्र खेळाडूंनी ज्याप्रकारे खेळ केला ते पाहून फार वाईट वाटले. आमच्या खेळाडूंची देहबोली ही खेळपट्टीसारखीच सपाट होती.”
शास्त्री यांनी समालोचन आणि प्रशिक्षणाविषयीही आपले मत मांडले आहे. ते म्हणाले, “समालोचन आणि संघाला प्रशिक्षण देणे यांच्यात खूप अंतर आहे. समालोचन करणे हे प्रशिक्षण देण्यापेक्षा सोपे आहे.” मात्र शास्त्री यांची काम करण्याची पद्धत बदलली नाही. त्यांचे काम अजूनही वाढल्याचे दिसून येत आहे. ते भारताचा सामना सुरू होण्याआधीच स्टेडियममध्ये पोहोल्यावर आपल्या कामाला लागतात. सामना संपल्यावर किमान दोन तास ते चर्चा करत असतात, तोपर्यंत भारतीय संघ हॉटेलमध्ये पोहोचलासुद्धा असतो. शास्त्री जेव्हा भारतीय संघाचे प्रशिक्षक होते तेव्हा त्यांच्याकडे चाहत्यांशी बोलायला वेळही नव्हता.
या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने संघाचे नेतृत्व केले. यावेळी रिषभ पंत (Rishabh Pant) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनीच विशेष कामगिरी केली आहे. बाकी भारतीय फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरल्याने भारताचा दुसरा डाव २४५ धावांतच संपुष्टात आला होता.
मागील वर्षी सुरू झालेल्या या कसोटी मालिकेचा अंत खूपच निराशाजनक राहिला याचे शास्त्री यांना फार वाईट वाटले आहे. भारताने २००७मध्ये इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतरच्या मालिकांमध्ये भारताच्या पदरी नेहमी निराशाच आली होती.
शास्त्री यांनी त्यावेळेचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या साथीने संघाला विजयाच्याजवळ नेले होते. मात्र ज्या निकालाची चाहते आतूरतेने वाट पाहत होते अखेर बरोबरीतच समाधान मानावे लागले आहे. भारतीय संघ आता इंग्लंड विरुद्ध मर्यादीत षटकांचे सामने खेळणार आहेत. यात तरी संघाने उत्तम कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: इंग्लंडमध्ये झाले धोनीचे बर्थडे सेलिब्रेशन, रिषभ पंतही होता उपस्थित
प्रतीक्षा संपली! अखेर भारत पाकिस्तान लवकरच भिडणार, वाचा कधी आणि कुठे होणार सामना