इंग्लंड आणि भारत यांच्यात सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका चालू आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत करावा लागला होता. पहिला सामना अनिर्णीत झाल्यामुळे राहिलेले ४ सामने निर्णायक ठरणार आहेत. मालिकेतील दुसरा सामना लाॅर्ड्सच्या ऐतिहासीक मैदानावर खेळला जात आहे. लाॅर्ड्स मैदानावर याआधी भारतीय संघाने केवळ दोन कसोटी सामने जिंकले आहेत.
सध्या याच मैदानावर चालू असलेल्या दुसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (१४ ऑगस्ट) इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स ऍंडरसन आणि भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह या दोघांमध्ये वाद झाला. समाजमाध्यमांवर या दोघांच्या वादाचा व्हिडियो व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत दिसते आहे की, ऍंडरसन बुमराहला रागात बरेवाईट बोलत आहे. वाद होण्याआधी बुमराहने ऍंडरसनला एका मागे एक वेगवान बाउंसर चेंडू टाकले होते. त्यातील एक चेंडू ऍंडरसनच्या हेल्मेटवरही लागला होता. अखेर दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद शमीने जेम्स ऍंडरसनला बाद केले आणि इंग्लंडचा डाव संपवला होता.
जेव्हा इंग्लंडचा डाव संपला तेव्हा ऍंडरसन तंबूत माघारी जाताना जसप्रीत बुमराहजवळ गेला आणि त्याला बरेवाईट बोलू लागला. रविवारी (१५ ऑगस्ट) सोनी स्पोर्ट्स वाहिनीवर प्री-शो कार्यक्रमात मागच्या दिवशीचे काही दृश्य दाखवली जात होती. कार्यक्रमादरम्यान बुमराहचे षटक आणि ऍंडरसनच्या प्रतिक्रियेबाबत चर्चा चालू होती.
https://twitter.com/CowCorner9/status/1426840887519182848?s=20
सामन्यादरम्यान बुमराहच्या जबरदस्त बाउंसरचा इंग्लंडच्या अनुभवी फलंदाजांनीमात्र चांगलाच सामना केला. त्यामुळेच जो रूट पुढच्या काही षटकात जास्त धावा करू शकला आणि संघाला ३९१ धावांपर्यंत पोहोचवले होते. परंतु संघाला फक्त नाममात्र २७ धावांची आघाडी मिळाली होती. या आघाडीचा टप्पा ओलांडल्यानंतर भारतीय संघ चौथ्या दिवसाखेर १५४ धावांनी पुढे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राहुलवर फक्त शॅम्पेन कॉर्क फेकले, माझ्यावर तर बाटल्या फेकल्या होत्या; दिग्गजाने ओढले ताशेरे
कमी प्रकाशातही पंचांनी चालू ठेवला खेळ, विराट-रोहितचा चढला पारा; राग व्यक्त करताना व्हिडिओ व्हायरल
कर्णधार रूटच्या संयमाचा तुटला बांध, भर मैदानात पंतसोबत घातला वाद; फोटो व्हायरल