इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील चौथा सामना २ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीवर आहेत. अशात मालिकेतील चौथा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा मानला जात आहे. इंग्लंडच्या संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारूण पराभव केला. असे असले तरी, इंग्लंडचा संघ चौथ्या सामन्यासाठी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणे जवळजवळ निश्चित आहे.
इंग्लंडचा कर्णधार जो रूटने आधीच घोषित केले होते की, ख्रिस वाोक्स संघात पुनरागमन करणार आहे. तसेच चौथ्या सामन्यासाठी खेळाडूंना झालेल्या दुखापती आणि खेळाच्या ताणामुळे संघातील एका वेगवान गोलंदाजाला विश्रांती दिली जाऊ शकते. हा वेगवान गोलंदाज कोण असेल? हे पाहावे लागेल.
इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस वोक्स मागच्या एक वर्षापासून कसोटी क्रिकेटमध्ये सहभागी झालेला नाही. मात्र, भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात सॅम करनच्या जागी त्याला संधी दिली जाणार, हे निश्चित झाले आहे. याविषयी बोलताना जो रूट म्हणाला, “हे त्याच्यासाठी एक भयानक स्वप्नासारखे होते. मग ते कोविड पाॅजिटिवच्या संपर्कात येणे असो किंवा त्याची दुखापत. तो या दोन कारणांमुळे खूप क्रिकेट खेळू शकला नाही. मात्र, जेव्हा तो खेळतो तेव्हा तो नेहमीप्रमाणे चांगलाच ठरला आहे. त्याला पुन्हा संघात सामील करणे आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. हे केवळ या सामन्यासाठी आणि मालिकेसाठी नाही, वोक्स जेव्हा कधी संघात असतो, तेव्हा आम्ही मजबूत स्थितित असतो”
कोणत्या वेगवान गोलंदाजाला मिळणार विश्रांती?
कसोटी मालिकेत इंग्लंडच्या संघातील अनेकांना दुखापती झाल्या आहेत. ख्रिस वोक्स संघात सामील झाल्यावर संघ व्यवस्थापन संघातील एका वेगवान गोलंदाजास विश्रांती देऊ इच्छित आहे. ते त्यांचा ताण कमी करू इच्छित आहेत. अशात जेम्स अंडरसन आणि अप्रतिम फार्ममध्ये गोलंदाजी करणारा ओली राॅबिन्सन यांच्यातील एकाला चौथ्या कसोटी सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते.
जो रूट याविषयी बोलताना म्हणाला, “हे प्रत्यक्षात महत्वाचे आहे. आम्ही पाहिले पाहिजे की, कोणता खेळाडू कोठे उभा आहे. या मालिकेत संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संतुलन ठेवणे खूप कठीण गोष्ट ठरली आहे. आम्हाला अनेक दुखापतींशी झुंज द्यावी लागली आहे आणि प्रदर्शनासोबतच खेळाचा ताणही कमी करण्याच्या प्रयत्नांतही अडचणी आल्या आहेत.”
चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला हे देखील ठरवावे लागेल की, ओली पोप आणि डॅन लाॅरेंस यांच्यातील कोणता खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल? इंग्लडचा महत्वाचा मानला जाणार खेळाडू जोस बटलर पितृत्वाच्या जबाबदारीमुळे रजेवर आहे. त्याच्याजागी जाॅनी बेयरस्टो संघासाठी यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वविजेत्या इंग्लंड संघाचा ‘हा’ क्रिकेटर सोडणार देश, भारतीय खेळाडूंसोबत खेळणार क्रिकेट
द्रविडच्या शिष्याचे ओमानविरुद्ध दमदार शतक, दुसऱ्या वनडेत मुबंईचा २३१ धावांनी दणदणीत विजय
अरेरे! ‘या’ क्रिकेटरने मित्रासाठी तोडले बायो-बबलचे नियम, मग काय स्पर्धेतून झाली हकालपट्टी