भारताचा कर्णधार विराट कोहली १२ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल खेळत आहे. त्यामुळे या १२ वर्षांत अनेक क्रिकेटपटूंबरोबर तो खेळला आहे. पण त्यांच्यातील एमएस धोनी आणि एबी डिविलियर्सबरोबर फलंदाजी करायला आवडते, असे विराट म्हणाला आहे.
विराट आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पिटरसनने काल(२ एप्रिल) इंस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ चॅट केले होते. या दरम्यान त्यांनी अनेक विषयांवर गप्पा मारल्या. या गप्पांदरम्यान पिटरसनने विराटला त्याला कोणत्या खेळाडूंबरोबर फलंदाजी करताना आवडते असे विचारले.
त्यावर विराट म्हणाला, ‘मला जे वेगात धावतात त्यांच्याबरोबर फलंदाजी करायला आवडते. त्यामुळे जेव्हा मी भारताकडून खेळतो तेव्हा एमएसबरोबर आणि जेव्हा मी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरबरोबर खेळतो तेव्हा एबी डिविलियर्सबरोबर फलंदाजी करायला आवडते. आम्ही बऱ्याचदा फलंदाजी करताना बोलत पण नाही.’
याबरोबरच विराटने या गप्पादरम्यान त्याला कसोटी क्रिकेट आवडते असेही सांगितले.
ट्रेंडिंग घडामोडी –
काहीही म्हणा, पण धोनीचे हे ५ विक्रम मोडणं केवळं अशक्यच
लाॅकडाऊन दरम्यान विराटचा मोठा निर्णय, क्रिकेटचा एक प्रकार खेळणं थांबवणार
५ भारतीय क्रिकेटपटू, ज्यांनी केले आहे महिला खेळाडूंशी लग्न