फिफा विश्वचषक 2022च्या स्पर्धेला रविवारी (20 नोव्हेंबर) सुरूवात झाली. पहिला सामना यजमान कतार विरुद्ध इक्वेडोर यांच्यात खेळला गेला. अल बायत स्टेडियमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात इक्वेडोरने 2-0ने विजय मिळवला. कतारच्या पराभवाने मात्र त्यांच्या नावावर नकोश्या तर इक्वेडोरने देखील अनोख्या विक्रमांची नोंद केली आहे.
विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यात कर्णधार एनर वलेन्सीया (Enner Valencia) याच्या पहिल्या सत्रातील दोन गोलच्या बळावर इक्वेडोरने कतारवर 2-0 ने मात केली. अल बायत स्टेडियमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात इक्वेडोरचा कर्णधार वलेन्सीयाने पहिला गोल केला होता जो ऑफसाइडला असल्याने वगळला गेला. या निकालाचा अर्थ असा आहे की कतार विश्वचषकात आपला पहिला सामना गमावणारा पहिलाच यजमान देश ठरला आहे.
फुटबॉल विश्वचषकाला 1930मध्ये सुरूवात झाली. तेव्हापासून ज्या-ज्या देशाला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते, त्या- त्या संघांनी सलामीचा सामना जिंकला होता, मात्र यंदा पहिल्यांदाच यजमान देशाने सामना गमावला आणि इतिहासातील 92 वर्ष जुना विक्रम मोडित निघाला.
सामना सुरू झाला तेव्हा तिसऱ्याच मिनिटाला वलेन्सीयाने गोल केला, मात्र वार (व्हिडिओ असिस्ट रेफ्री) तो नामंजूर केला. एवढे होऊनसुद्धा वलेन्सीया मागे हटला नाही आणि त्याने 16व्या मिनिटाला गोल करत इक्वेडोरला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्याने हा गोल पेनल्टीच्या मार्फत केला. त्याचा हा गोल थांबवण्याचा प्रयत्न गोलकिपर शाद अल शीब याने केला, मात्र त्याला यलो कार्ड मिळाले. सामन्याच्या 31व्या मिनिटाला वलेन्सीयाने पुन्हा एकदा गोल केला. त्यामुळे पहिल्या सत्रात इक्वेडोर 2-0 असा पुढे राहिला. तसेच पुढच्या सत्रात त्यांनी कतारला गोल करण्याची संधीच दिली नाही.
⏱ Ecuador take the points in our first game at #Qatar2022! @adidasfootball | #FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 20, 2022
दोन्ही संघानी केलेले विक्रम-
या सामन्यात अनेक विक्रम रचले गेले. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच यजमान संघाने सलामीचा सामना गमावला. तसेच 2018मध्ये हे दोन संघ जेव्हा समोरा-समोर आले होते, तेव्हाही वलेन्सीयानेच दोन गोल केले होते. तो सामना कतारने 4-3 असा जिंकला होता. तसेच पहिल्यांदाच विश्वचषकात असे घडेल जेव्हा पहिला गोल पेनल्टीने केला गेला.
त्याचबरोबर या सामन्यात गोल करण्यासाठी 11 शॉट्स खेळले गेले. ज्यातील 5 कतारने आणि सहा इक्वोडोरने मारले. तसेच 1966 पासून विश्वचषकात पहिल्यांदाच गोलसाठी एवढे कमी प्रयत्न केले गेले. Qatar v ECUADOR FIFA 2022, The 92-year-old record of the World Cup was broken in the first match itself
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: चहल, सिराज आणि शार्दुलचा ‘सँडविच ब्रोमान्स’! ड्रेसिंग रुमचा व्हिडिओ व्हायरल
अवघ्या 15 चेंडूत विजय, केनिया संघाकडून टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये नव्या विक्रमाची नोंद