Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अवघ्या 15 चेंडूत विजय, केनिया संघाकडून टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये नव्या विक्रमाची नोंद

अवघ्या 15 चेंडूत विजय, केनिया संघाकडून टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये नव्या विक्रमाची नोंद

November 22, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Kenya Cricket Team

Photo Courtesy: Twitter/KenyaCricketoff


क्रिकेटमध्ये विक्रम हे तुटण्यासाठीच बनवले जातात, असे म्हटले जाते. रविवारी भारत आणि न्यूझीलंड संघ आमने सामने असताना चाहत्यांना एक रोमांचक लढत पाहायला मिळाली. भारताने हा सामना 65 धावांनी जिकंला. पण दुसरीकडे केनिया क्रिकेट संघाने मात्र विश्वविक्रम केला. माली संघाविरुद्ध खेळलेल्या या सामन्यात केनियाने 105 चेंडू शिल्लक ठेवत विजय मिळवला. 

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकासाठी सब रिजनल आफ्रिका क्लालिफायर सामने केळले जाते आहेत. यातील 10वा सामना केनिया आणि माली संघात खेळला गेला. या सामन्यात माली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कर्णधार चेइक केइता (Cheick Keita) याने घेतलाल हा निर्णय चुकीचा ठरला. कारण माली संघाची धावसंख्या अवघी 8 अशताना त्यांच्या 6 फलंदाजांनी विकेट्स गमावल्या होत्या. त्यांचा फक्त एक फलंदाज 10 धावांचा टप्पा ओलांडू शकला होता.

माली संघाचे 6 फलंदाज खातेही खोलू शकले नाहीत
माली संघासाठी थियोडोर मकालू (Theodore Macalou) हा एकटा फलंदाज होता, ज्याने 10 पेक्षा जास्त म्हणजेच 12 धावांची खेळी केली. या धावा करण्यासाठी त्याने 20 चेंडूंचा सामना केला. त्यांचे 6 फलंदाज एकही धाव न करता तंबूत परतले. माली संघ या सामन्यात 10.4 षटकांमध्ये 30 धावा करून सर्वबाद झाला. केनियासाठी वेगवान गोलंदाज पीटर लंगाट याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. मालीकडून मिळालेले 30 धावांचे लक्ष्य केनियाचे सलामीवीर पुष्कर शर्मा आणि कोलिंस ओबुया यांनी संघाला वेगवान सुरुवात दिली. केनियाने एकही विकेट न गमावता 2.3 षटकात हा सामना जिंकला. म्हणजेच तब्बव 105 चेंडू शिल्लक ठेवून केनिया संघ विजयी झाला. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये चेंडूंच्या बाबतीत हा एखाद्या संघाला मिळालेला सर्वात मोठा विजय आहे.

ऑस्ट्रेलियन संघाचा विक्रम मोडीत –
यापूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या नावावर हा विक्रम होता. ऑस्ट्रेलियाने 31 ऑगस्ट 2019 मध्ये तुर्की संघाविरुद्ध 2.4 षटकात 10 विकेट्स राखून विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना 104 चेंडू शिल्लक ठेवून नावावर केला होता, पण केनियाने आता त्यांचा हा विक्रम मोडीत काढला आहे.  (Playing against Mali, Kenya won in just 15 balls and also set a world record)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसी स्पर्धांमध्ये सलग 3 वेळेस फायनलचे तिकीट मिळवणारे कर्णधार, एकमेव भारतीयाचा समावेश
सूर्याने विरोधी संघाच्या कर्णधारालाही पाडली भुरळ! सामना संपल्यानंतर विलियम्सन म्हणाला…  


Next Post
Yuzvendra Chahal & Shardul Thakur & Mohammed Siraj

VIDEO: चहल, सिराज आणि शार्दुलचा 'सँडविच ब्रोमान्स'! ड्रेसिंग रुमचा व्हिडिओ व्हायरल

Enner VALENCIA (Qatar v ECUADOR FIFA 2022)

पहिल्या सामन्यातच फुटबॉल विश्वचषकाचा 92 वर्ष जुना विक्रम मोडीत, कतारवर इक्वेडोर पडले भारी

Narayan Jagadeesan

एन जगदीसनचा वनडे क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; विराट कोहली, कुमार संगकाराला टाकले मागे

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143