---Advertisement---

नॉर्किएची कमाल! रसेलला काही कळायच्या आत उडाल्या दांड्या; व्हिडिओ व्हायरल

On: बुधवार, ऑक्टोबर 27, 2021 8:42 AM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिज यांच्यात टी२० विश्वचषक स्पर्धेतील सुपर १२ चा सामना खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने १४३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने निर्धारित लक्ष्य आठ गडी राखून सहज पार केले. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेच्या एन्रिक नॉर्किएने आंद्रे रसेलला बाद केले. नोर्किएने रसेलला ज्या पद्धतीने गोलंदाजी केली तो अप्रतिम चेंडू होता. त्याने रसेलला अचूक यॉर्कर टाकला आणि त्रिफळाचीत केले. आयसीसीने रसेलला त्रिफळाचीत केल्याचा व्हिडिओही शेअर केला आहे. नोर्किएच्या चेंडूचे चाहते कौतुक करत आहेत.

सामन्यादरम्यान, नॉर्किएने रसेलला ज्या चेंडूवर बाद केले तो चेंडू ताशी १४८ किलोमीटर वेगाने फेकला गेला होता. त्रिफळाचीत झाल्यानंतर रसेलही काही काळ चकित झाला होता. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडविरुद्ध केवळ ५५ धावांवर बाद झाला होता. म्हणून या सामन्यात वेस्ट इंडिजने सावध फलंदाजी केली पण आता त्यांनी हाही सामना गमावला.

 

सामन्यादरम्यान रसेल बाद झाला त्यावेळी दक्षिण आफ्रिका संघाला त्याच्या विकेटची खुप गरज होती. दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने नॉर्किएला रसेलविरुद्ध गोलंदाजी करण्याचा विचार केला आणि नोर्किएने कर्णधाराच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. उत्कृष्ट गोलंदाजी करत त्याने वेस्ट इंडिज फलंदाजाचे मोठी धावसंख्या उभारण्याचे मनसुबे हाणून पाडले

वेस्ट इंडिजसाठी फक्त एविन लुईसने चांगली फलंदाजी करत ३५ चेंडूत ५६ धावा केल्या. लुईसने ६ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली. गतविजेत्या संघासाठी कर्णधार कायरन पोलार्डने २६ धावांचे योगदान दिले. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रिटोरियसने १७ धावांत तीन बळी घेतले. केशव महाराज आणि कागिसो रबाडा यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले. या पराभवामुळे वेस्ट इंडिज संघासाठी सेमी फायनलसाठीचा मार्ग कठीण झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---