---Advertisement---

इंग्लंडला बसू शकतो धक्का; कर्णधार मॉर्गनबरोबरच ‘हा’ खेळाडू दुसऱ्या वनडेला मुकण्याची शक्यता

On: गुरूवार, मार्च 25, 2021 12:24 AM
---Advertisement---

पुण्यात 26 मार्च रोजी भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्याआधी इंग्लंडसाठी एक वाईट बातमी आहे. बातमी अशी आहे की, पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन आणि सॅम बिलिंग्ज या दोन खेळाडूंना दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. दुखापतीची तीव्रता पाहता मॉर्गन आणि बिलिंग्ज हे दोघे भारताविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात खेळण्याची शक्यता फार कमी आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या सॅम बिलिंग्जला क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाली. तर क्षेत्ररक्षणादरम्यान कर्णधार मॉर्गन देखील जखमी झाला होता. मॉर्गनच्या हाताला चेंडूत लागल्याने अंगठ्याला व बोटाला मोठी जखम झाली. त्यामुळे हे दोन क्रिकेटपटू दुसर्‍या एकदिवसीय सामन्यांत खेळतात की नाही हे फक्त वेळच सांगू शकते. भारताने पहिला सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

इयॉन मॉर्गन हा इंग्लड संघाचा कर्णधार असून त्याने संघासाठी 243 एकदिवसीय सामने खेळताना 91.4 च्या सरासरीने 7620 धावा केल्या आहेत. तर सॅम बिलिंग्ज हा इंग्लडचा उजव्या हाताचा फलंदाज असून त्याने 22 एकदिवसीय सामने खेळताना 93.1 च्या सरासरीने 604 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

वनडे क्रमवारी: विराट कोहली अव्वल क्रमांकावर कायम, मात्र रोहित शर्मा…

आठवणीतील सामना: भारताने जेव्हा सलग चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या इराद्यावर फेरले होते पाणी

कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारत पाठविणार मोठे पथक? कोरोना नाही तर ‘हे’ आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---