आजपासून 12 व्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. आज या विश्वचषकातील पहिला सामना यजमान इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात द ओव्हल मैदानावर सुरु आहे.
हा सामना इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनसाठी खास ठरला आहे. कारण त्याचा हा इंग्लंडकडून 200 वा वनडे सामना आहे. त्यामुळे तो इंग्लंडकडून 200 वनडे सामना खेळणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी कोणत्याही खेळाडूला इंग्लंडकडून 200 वनडे सामने खेळता आलेले नव्हते.
विशेष म्हणजे मॉर्गनने वनडे क्रिकेटमध्ये आयर्लंडकडून पदार्पण केले होते. त्याने आयर्लंडकडून स्कॉटलँड विरुद्ध 5 ऑगस्ट 2006 ला पदार्पण केले होते. तो 2006 ते 2009 दरम्यान 23 सामने आयर्लंडकडून खेळला. यानंतर त्याने 24 मे 2009 ला इंग्लंडकडून पहिला वनडे सामना खेळला.
याबरोबरच मॉर्गनने आज 57 धावांची अर्धशतकी खेळी करताना वनडे क्रिकेटमध्ये 7000 धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला आहे. त्याच्या आता 223 वनडे सामन्यात 7034 धावा झाल्या आहेत. यापैकी त्याने आयर्लंडकडून खेळताना 23 सामन्यात 744 धावा केल्या आहेत. तर इंग्लंडकडून 200 सामन्यात 6290 धावा केल्या आहेत.
आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी या सामन्यात सुरुवात चांगली करताना जॉनी बेअरस्टोला शून्य धावेवर बाद केले. मात्र त्यानंतर इंग्लंडकडून जेसन रॉय, जो रुट, मॉर्गन, बेन स्टोक्स यांनी अर्धशतकी खेळी केल्या आहेत.
इंग्लंडकडून सर्वाधिक वनडे सामने खेळणारे खेळाडू –
200 वनडे – इयान मॉर्गन
197 वनडे – पॉल कॉलिंगवूड
194 वनडे – जेम्स अँडरसन
170 वनडे – ऍलेक स्टिवर्ट
161 वनडे – इयान बेल
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–तो एक विक्रम व्हायला १२ विश्वचषकांची पहावी लागली वाट
–जर विश्वचषकात संघांचे गुण सारखे झाले तर घेतला जाणार हा निर्णय
–महा स्पोर्ट्सचे विश्वचषक २०१९साठी कंटेंट डिलीव्हरी प्लटफाॅर्म माझी मराठीबरोबर टायअप





