मुंबई । देशातील पहिले प्रादेशिक क्रीडा न्यूज वेब पोर्टल महा स्पोर्ट्सने विश्वचषकाच्या शुभ मुहूर्तावर माझी मराठी या मराठीतील सोशल मीडिया कंटेंट डिलीव्हरी प्लॅटफाॅर्मबरोबर टायअप केले आहे. विश्वचषकातील खास घडामोडी, वृत्त, आकडेवारी, व्हीडिओ विश्लेषण तसेच आकडेवारी मराठी क्रीडाप्रेमींपर्यंत पोहचण्यासाठी महा स्पोर्ट्स आणि माझी मराठी प्लॅटफाॅर्म विश्वचषक काळात सोबत काम करणार आहे.
मुंबईस्थित माझी मराठीचे आघाडीच्या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर मोठे फाॅलोवर्स असून ट्वीटरवर मराठीतील पहिल्या तीन हॅंडल्समध्ये त्यांचा समावेश होतो. तर महा स्पोर्ट्स ही डिसेंबर २०१६मध्ये सुरु झालेल्या वेबसाईटने मराठी क्रीडा विश्व व्यापून घेतले आहे. आघाडीच्या न्यूज अग्रीगेटरबरोबर काम करताना महा स्पोर्ट्सचा पोर्टलचा तगडा फॅन बेस आहे. तरीही ज्या वाचक किंवा क्रीडाप्रेमींपर्यंत वेबसाईट पोहचली नाही त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा माझी मराठीद्वारे प्रयत्न असणार आहे.
“आमचा वाचक हा सर्व वर्गातील असून त्यांच्यापर्यंत पुढील दिड महिना आम्ही जास्तीत क्रीडा वृत्त तसेच विश्वचषकाशी संबंधीत गोष्टी नेण्याचा आमचा प्रयत्न असेल. यातून अनेक कधीही न पाहिलेल्या गोष्टी वाचकांना वाचयला पहायला मिळतील. ” असे यावेळी माझी मराठीचे प्रमुख निलेश पवार म्हणाले.
“विश्वचषक ही एक मोठी उपलब्धी असून ज्या आम्ही आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक ग्राफीक्सच्या माध्यमातून २०१९ विश्वचषकाची आकडेवारी वाचकांपर्यंत पोहचवली आहे. माझी मराठीशी टायअपच्या माध्यमातून आम्ही अगदी ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत विश्वचषकाच्या अपडेट्स पोहचवणार आहोत. ” असे यावेळी महा स्पोर्ट्सचे सीईओ चिन्मय रेमणे म्हणाले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–इंग्लंडचा हा गोलंदाज म्हणतो, ‘मी भारतीय असतो तर इशांत शर्मा झालो असतो’
–विश्वचषकादरम्यान विराटबरोबर फोटो काढण्याची चाहत्यांना रोज मिळणार संधी, जाणून घ्या कारण
–६० सेकंड्स चॅलेंजसह असा पार पडला २०१९ विश्वचषकाचा भव्य उद्घाटन सोहळा