इंग्लंड आणि वेल्समध्ये आजपासून(30 मे) आयसीसीच्या 12 व्या विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. हा विश्वचषक सुरु होण्याआधी मेणांच्या पुतळ्यांसांठी प्रसिद्ध असलेल्या मदाम तुसाद संग्रालयाने बुधवारी(29मे) लंडनमध्ये लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे.
विराटचा हा मेणाचा पुतळा आजपासून 15 जूलैपर्यंत म्हणजेच विश्वचषक स्पर्धेदरम्यान मदाम तुसादमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
याबद्दल लंडनमधील मदाम तुसादचे व्यवस्थापक स्टिव्ह डेविस म्हणाले, ‘क्रिकेट फिव्हर पुढिल काही आठवड्यांसाठी देशभरात राहणार आहे. त्यामुळे लॉर्ड्स या आमचे शेजाऱ्यांच्या मदतीने विराट कोहलीच्या पुतळ्याचे आनावरण करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे.’
‘आम्हाला आशा आहे की क्रिकेट चाहते त्यांच्या हिरोला फक्त मैदानातच नाही तर लंडनमधील मदाम तुसादमध्ये पाहण्याचाही आनंद घेतील.’
विराटचा पुतळा हा हातात बॅट घेऊन भारताची मर्यादीत षटकांच्या क्रिकेटची जर्सी घातलेला असून या पुतळ्यासाठी खूद्द विराटनेच त्याचे शूज आणि ग्लव्हज दिले आहेत.
विराटचा हा पुतळा गुरुवारपासून लंडन येथील मदाम तुसादमध्ये उसेन बोल्ट, सर मोहम्मद फराह, भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर या दिग्गजांच्या पुतळ्यासह चाहत्यांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
विराटच्या मेणाच्या पुतळ्याच्या अनावरणाबद्दल लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडचे रिटेल आणि टूर प्रमुख तारह कुनीनघम म्हणाले, ‘विश्वचषकाच्या पूर्वसंध्येला विराट कोहलीसारख्या व्यक्तिमत्वाच्या पुतळ्याचे आनावरण करण्यासाठी लॉर्ड्स हे सर्वोत्तम ठिकाण आहे.’
‘क्रिकेटच्या या रोमांचकारी मोसमामुळे हजारो पर्यटक या मैदानाला भेट देतील आणि लॉर्ड्सच्या टूरची आणि एमसीसी म्यूझीयमची मजा घेतील. मदाम तुसादला भेट देणाऱ्या क्रिकेट चाहत्यांसाठी विराट सारख्या प्रसिद्ध फलंदाजाचा पुतळा आनंद देईल.’
https://twitter.com/naveenachary201/status/1133947786515189760
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–६० सेकंड्स चॅलेंजसह असा पार पडला २०१९ विश्वचषकाचा भव्य उद्घाटन सोहळा
–Video: टीम इंडियातील हा खेळाडू आहे सर्वात वाईट डान्सर, जडेजाने केले गमतीशीर खूलासे
–बोट आहे फ्रॅक्चर तरीही इंग्लंडच्या कर्णधाराने पूर्ण केले हे चॅलेंज, पहा व्हिडिओ






