---Advertisement---

Video: टीम इंडियातील हा खेळाडू आहे सर्वात वाईट डान्सर, जडेजाने केले गमतीशीर खूलासे

On: बुधवार, मे 29, 2019 8:03 PM
---Advertisement---

12 व्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला उद्यापासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरुवात होणार आहे. या विश्वचषकाला सुरुवात होण्याआधी भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाचा एक गमतीशीर व्हिडिओ आयसीसीने विश्वचषकाच्या ट्विटर हँडेलवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये जडेजाला अनेक प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तरे देताना रोहितने संघसहकाऱ्यांबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

जडेजाने संघातील कोण सर्वात जास्त सेल्फी काढतात असे विचारल्यावर त्याने सलामीवीर फलंदाज शिखर धवनचे नाव घेतले आहे. तसेच संघातील सर्वात वाईट डान्सर कोण आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना जडेजाने सांगितले की यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी सर्वात वाईट डान्सर आहे.

त्याचबरोबर पुढे जडेजाला विचारले की गाणे म्हणण्यासाठी सर्वातआधी माईक कोण पकडते. यावर जडेजाने कर्णधार विराट कोहली असे उत्तर दिले. तसेच नेहमी जिममध्ये कोण असते या प्रश्नवरही जडेजाने विराटचे नाव घेतले आहे.

जसप्रीत बुमराह रोमॅटिंक कॉमेडी बघणे पसंत करतो असे देखील जडेजाने सांगितले आहे. याबरोबरच स्वत:ला सर्वाधिक वेळा गुगल कोण करते या प्रश्नावर जडेजाने युजवेंद्र चहल असे उत्तर दिले आहे. तसेच सकाळी चिडलेले कोण असते या प्रश्नावरही जडेजाने चहलचेच नाव घेतले आहे.

तसेच रोहित शर्मा कॉफीचा चाहता असल्याचे आणि तो नेहमी बसमध्ये येण्यासाठी उशीर करत असल्याचेही जडेजाने सांगितले आहे.

या सर्वप्रश्नांची उत्तरे देताना जडेजाला त्याचे हसू आवरता येत नसल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसते.

जडेजा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने विश्वचषकापूर्वी झालेल्या दोन्ही सराव सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या सराव सामन्यात भारताची वरची आणि मधली फळी लवकर बाद झाल्यानंतरही तळातल्या फलंदाजांच्या साथीने भारताचा डाव सांभाळत 54 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.

तसेच त्याने बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यात अखेरच्या षटकात फलंदाजीला येत 4 चेंडूत 11 धावांची नाबाद खेळी केली होती. त्याचबरोबर त्याने या दोन सामन्यात प्रत्येकी 1 विकेटही घेतली आहे.

या दोन सराव सामन्यांपैकी भारताने न्यूझीलंड विरुद्ध पराभव स्विकारला आहे तर बांगलादेश विरुद्ध विजय संपादन केला आहे. आता भारताचा विश्वचषकातील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 जूनला साऊथँप्टनला होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

–बोट आहे फ्रॅक्चर तरीही इंग्लंडच्या कर्णधाराने पूर्ण केले हे चॅलेंज, पहा व्हिडिओ

–बुमराहच्या सुरेख यॉर्करवर बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू झाला क्लीन बोल्ड, पहा व्हिडिओ

–विश्वचषकापूर्वी रिषभ पंतने टीम इंडियाला दिला खास संदेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment