---Advertisement---

पार्टीत गेलेला मॉर्गन १७ वर्षीय मुलीच्या प्रेमात पडला, नंतर धुमधडाक्यात केलं लग्न

On: बुधवार, जून 29, 2022 10:18 PM
Eoin-Morgan
---Advertisement---

इंग्लंडला २०१९ मध्ये पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार इयॉन मॉर्गनने मंगळवारी (२८ जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मैदानात नेहमी शांत अंदाजात दिसणाऱ्या मॉर्गनने मैदानात वाद घातल्याचे आठवत नाही. त्याचे कारण म्हणजे त्याचा मनमिळावू स्वभाव. क्रिकेटव्यतिरिक्त मॉर्गन त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील शांत आणि जबाबदार व्यक्ती आहे. खासकरून त्याच्या पत्नीसाठी मॉर्गन एक आदर्शन पती आहे.

इयॉन मॉर्गन (Eoin Morgan) आणि त्याची पत्नी तारा यांची प्रेमकहानी खूपक रंजक आहे. २०१० साली या दोघांची पहिली भेट झाली होती. त्यावेळी २१ वर्षीय मॉर्गन इंग्लंड संघासोबत ऑस्ट्रेलियामध्ये ऍशेज मालिका खेळण्यासाठी आला होता. मालिकेतून वेळ काढून इंग्लंडचे खेळाडू एका एडीलेडमधील एका बारमध्ये मस्ती करत होते. त्याचवेळी मॉर्गन आणि १७ वर्षाच्या ताराची पहिली भेट झाली.  ताराचे सैदर्य पाहून मॉर्गन त्याच क्षणी त्याच्या प्रयत्नात पडला. खूप हिंमत करून मॉर्गन ताराशी बोलला होता. तेव्हापासूनच या दोघांची ओळख झाली आणि पुढे हे संबंध प्रेमात बदलले.

तारा आणि मॉर्गन यांच्यात सुरुवातीला बोलणे चारणे वाढले आणि नंतर भेटी गाठीचे सत्र सुरू झाले. मॉर्गने अधून मधून तिला भेटण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये जाऊ लागला. तारा त्यावेळी शिक्षण घेत होती. तिने सुरुवातील एलएलबी आणि  नंतर बॅचलर ऑफ इन इंटरनॅसन रिलेशन्समध्ये अँड पब्लिस रिलेशन्स या विभागाद पदवीचे शिक्षण घेतले. यादरम्यान तिने मॉडलिंगही केली आणि खूप नावही कमावले. मॉर्गनलाही वाटायचे की, ताराने लग्नाच्या आधी तिचे शिक्षण पूर्ण करावे.

मॉर्गनसोबत ताराचे संबंध तयार झाल्यानंतर तिच्या घरचेही आनंदी होते. दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी तारा लंडनमध्ये आली आणि मॉर्गनसोबत राहू लागली. तिचे शिक्षण जेव्हा पूर्ण झाले, तेव्हा दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये मॉर्गनने तारासोबत साखरपुडा पार पाडला आणि २०१८ मध्ये दोघांचे लग्न झाले. मार्च २०२० मध्ये ताराने एका सुंदर मुलीला जन्म दिला, जिते नाव त्यांनी लियो लुइस ओलिवर, असे ठेवले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

एका सामन्यात चांगली खेळी, थेट आयसीसी क्रमवारीत लांब उडी! वाचा हुड्डा अन् सॅमसन रँकिंगमध्ये कितव्या स्थानावर

वॉर्नरचा झेल पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडूंही शॉक, पाहा श्रीलंकान कर्णधार कसा झाला बाद

मोईन अलीने टाकली बीसीसीआयसमोर फिरकी! म्हणाला ‘भारताचे नेतृत्व पुन्हा विराट कोहलीकडे द्यायला हवे’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---