---Advertisement---

एका सामन्यात चांगली खेळी, थेट आयसीसी क्रमवारीत लांब उडी! वाचा हुड्डा अन् सॅमसन रँकिंगमध्ये कितव्या स्थानावर

On: बुधवार, जून 29, 2022 8:05 PM
Sanju-Samson-Deepak-Hooda
---Advertisement---

आयर्लंड आणि भारत यांच्यातील टी-२० मालिका नुकतीच पार पडली. भारताने २-० अशा फरकाने मालिका नावावर केली. बुधवारी आयसीसीने जाहीर केलेल्या ताच्या क्रमवारीमध्ये भारतीय टी-२० संघात सहभागी असणाऱ्या खेळाडूंना मोठा फायदा झाला आहे. एकदिवसीय आणि कसोटी क्रमवारीतही मोठे फेरबदल घडले आहेत.

आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत दीपक हुड्डा (Deepak Hooda) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांनी अप्रतिम फलंदाजी केली आणि याचा मोठा फायदा त्यांना टी-२० क्रमवारीत (ICC T20 Ranking) झाला आहे. इशान किशन या मालिकेत चांगले प्रदर्शन करू शकल नाही, त्यामुळे त्याला नुकसान सोसावे लागले आहे. आयसीसीच्या ताज्या टी-२० क्रमावारीत हुड्डाला तब्बल ४१४ स्थानांचा फायदा झाला आणि तो सध्या १०४ क्रमांकावर आला आहे. हुड्डाने या दोन सामन्यांच्या मालिकेत १५१ धावा केल्या होत्या.

सॅमसनने आयर्लंडविरुद्धच्या एका सामन्यात ७७ धावा केल्या, ज्यामुळे त्याला ५७ स्थानांचा फायदा झाला. तो सध्या १४४ व्या क्रमांकावर आहे. इशान किशन यापूर्वी सहाव्या क्रमांकावर होता, तो आता सातव्या क्रमांकावर घसरला आहे. आयर्लंडचा हॅरीस टेक्टर ५५ स्थानांच्या फायद्यासह ६६ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गोलंदाजांमध्ये हर्षल पटेल चार स्थानांच्या फायद्यासह ३३ आणि आयर्लंडचा मार्क अडेयर दोन स्थानांच्या फायद्यासह ४३ व्या क्रमांकावर आहेत.

नेदरलंँड-इंग्लंड  आणि श्रीलंका-ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटच्या एकदिवसीय सामन्यानंतर एकदिवसीय क्रमारीत काही महत्वाचे बदल झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा एलेक्स कॅरी तीन स्थानांच्या फायद्यासह २३ व्या, तर इंग्लंडचा जोस बटलर चार स्थानांच्या फायद्यासह २५ व्या क्रमांकावर आला आहे. गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जोस हेजलवुड दोन स्थानांच्या फायद्यासह पाचव्या, तर इंग्लंडचा डेविड विली तीन स्थानांच्या फायद्यासह ३३ व्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

इंग्लंड-न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेमुळेही क्रमवारीत मोठे बदल झाले. फलंदाजांमध्ये जो रुट पहिल्या स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेल चार स्थानांच्या फायद्यासह १२ व्या आणि टॉम ब्लंडेल ११ स्थानांच्या फायद्यासह २० व्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंग्लंडचा जॉनी बेयरस्टो २० स्थानांच्या फायद्यास २१ व्या आणि ऑली पॉप तीन स्थानांच्या फायद्यासह ४९ व्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडीजच्या क्रेग ब्रेथवेट एक स्थानाच्या फायद्यासह २७ व्या, तर कायल मेयर्स २२ स्थानाच्या फायद्यासह ५७ व्या क्रमांकावर आहे. जॉन कॅपबेल चार स्थानांच्या फायद्याने ७६ व्या क्रमांकावर आहे. बांगलादेशच्या नुरुल हसनने १४ स्थानांची झेप घेत ८४ वा क्रमांक गाठला, तसेच हुसैन शंटोने ११ स्थानांची झेप घेत ८८ वा क्रमांक गाठला.

महत्वाच्या बातम्या –

पहिल्या सामन्यात महागडा ठरला, तरीही उमरानकडे का दिले विसावे षटक? कर्णधार हार्दिकचा खुलासा

एवढी मोठी धावसंख्या केली, तरीही टीम इंडियाच्या नावावर नकोसा विक्रम; वाचा काय घडले

टी२० कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळीनंतरही भरले नाही संजूचे मन; म्हणाला, ‘माझ्याकडे संधी होती, पण…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---