शारजाह। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत सोमवारी (१ नोव्हेंबर) इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात सामना झाला. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने २६ धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनच्या नावावार मोठा विश्वविक्रम झाला आहे.
श्रीलंकेविरुद्ध मिळवलेला विजय हा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील मॉर्गनचा हा ४३ वा विजय होता. त्यामुळे तो आता आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगाणला आणि भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकले आहे.
असगर अफगाणनने ४२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून विजय मिळवला आहे, तर एमएस धोनीने देखील ७२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत नेतृत्व करताना ४२ सामन्यांत विजय मिळवला आहे.
मॉर्गनने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ६८ सामन्यांत नेतृत्त्व केले आहे. त्यातील ४३ सामन्यांत त्याने विजय मिळवला असून २४ सामने तो पराभूत झाला आहे. तसेच १ सामन्याचा निकाल लागलेला नाही.
पाँटिंग, स्मिथप्रमाणे कामगिरी
मॉर्गनने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवले आहेत. तसेच वनडेमध्ये रिकी पाँटिंगने कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकले आहेत. त्याने १६५ विजय मिळवले आहेत, तर कसोटीमध्ये असा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथच्या नावावर आहेत. स्मिथने कसोटीत कर्णधार म्हणून ५३ विजय मिळवले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार
४३ विजय – ओएन मॉर्गन (६८ सामने)
४२ विजय – असगर अफगाण (५२ सामने)
४२ विजय – एमएस धोनी (७२ सामने)
२९ विजय – सर्फराज अहमद (३७ सामने)
२९ विजय – विराट कोहली (४७ सामने)
With 43 wins, Morgs becomes the most successful men's captain in IT20 cricket.
Our captain ❤️#T20WorldCup #EnglandCricket pic.twitter.com/1wXYKUoHJi
— England Cricket (@englandcricket) November 1, 2021
इंग्लंड उपांत्य फेरीत
सोमवारी इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवताच टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान पक्के केले आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, इंग्लंडने जोस बटलर आणि ओएन मॉर्गन यांच्या ११२ धावांच्या भागीदारीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १६३ धावसंख्या गाठली.
बटलरने शतकी खेळी केली. त्याने ६७ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावांची खेळी केली. तसेच मॉर्गनने त्याला चांगली साथ देताना ३६ चेंडूत ४० धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर दुश्मंता चमिराने १ विकेट घेतली.
त्यानंतर १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १९ षटकांत १३७ धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगाने सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून आदील राशिद, ख्रिस जॉर्डन आणि मोईन अलीने सर्वाधिक प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच लिआम लिव्हिंगस्टोन आणि ख्रिस वोक्सने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
युनिव्हर्स जोस! झंझावाती शतकासह लावली विक्रमांची रांग
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीचे १० वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्वीट होतंय जोरदार व्हायरल
“धोनी म्हणाला मला रिटेन करू नका”; चेन्नईच्या संघमालकांचा खळबळजनक खुलासा