---Advertisement---

‘सर म्हणणे चुकीचे नाही,’ भारतीयांची खिल्ली उडवल्याचा आरोप होत असलेल्या ट्वीटवर मॉर्गनची प्रतिक्रीया

On: शुक्रवार, जून 25, 2021 7:59 AM
---Advertisement---

गेल्या काही दिवसांपूर्वी इंग्लंडचागोलंदाजी अष्टपैलू ओली रॉबिन्सनच्या निलंबनाचे प्रकरण चांगलेच गाजले होते. ओली रॉबिन्सनने न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र हाच सामना त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला. त्याने २०१२-१३ मध्ये केलेले वर्णद्वेषी ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे इसीबीने हा कठोर निर्णय घेतला होता. त्यानंतर ओएन मॉर्गन आणि जोस बटलर यांचे देखील जुने ट्विट व्हायरल होऊ लागले होते. याबाबत आता ओएन मॉर्गनने आपले मत मांडले आहे.

ओएन मॉर्गनचे आणि जोस बटलर यांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यावरून त्यांच्यावर भारतीयांची खिल्ली उडवण्याचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत बोलताना ओएन मॉर्गन म्हणाला, “मी याबाबत फारसा विचार करत नाही. कारण मी सोशल मीडिया असो किंवा कुठेही एखाद्याला ‘सर’ असे उच्चारले तर ते आदरार्थी वाटते. परंतु हेच जर चुकीच्या अर्थाने सादर केले जात असेल, तर याबाबत मी काहीच करू शकत नाही. म्हणून मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले.” (Eoin Morgan said past tweet were distorted)

काय होते प्रकरण?
मॉर्गनचे जे जुने ट्वीट व्हायरल झाले होते त्यामध्ये त्याने म्हटले होते की, “मी नेहमीच उत्तर देतो सर. तुम्हाला जसा मी आवडतो, तसा कोणाला आवडत नाही.” तसेच त्यानंतर आणखी एक ट्विट व्हायरल झाले होते, ज्यात मॉर्गनने बटलरला टॅग करत लिहिले होते की, “सर तुम्ही माझे आवडते फलंदाज आहात.”

महत्वाच्या बातम्या –

WTC फायनलमध्ये भारतीय संघाला नडल्या ‘या’ ५ चूका; वाचा काय आहेत पराभवाची कारणे

आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंड भारताविरुद्धच्या सामन्यात नेहमीच ‘ड्रायव्हिंग सीटवर’, पाहा गेल्या २ दशकातील निकाल

‘टीम इंडिया क्रिकेट विश्वातील नवा चोकर’, चाहत्यांकडून सोशल मीडियावर कडाडून टीका; मीम्सही व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---