---Advertisement---

क्रिकेट विश्वचषकाच्या गाजलेल्या जाहिराती, ज्या तुम्हाला आठवण करुन देतात तुमचं बालपण

On: शुक्रवार, एप्रिल 2, 2021 2:00 PM
---Advertisement---

क्रिकेट वर्ल्डकप म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात मोठा सोहळा असतो. प्रत्येक क्रिकेटचा चाहता चार वर्षातून एकदा होणाऱ्या या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असलेला दिसतो. वर्ल्डकपची उत्कंठा वाढवण्यासाठी जाहिरातींद्वारे जी प्रसिद्धी केली जाते त्याला देखील अजिबात तोड नसते.

प्रत्येक वर्ल्डकप एखाद्या खेळाडूंमुळे, एखाद्या चांगल्या खेळीमुळे, गोलंदाजी प्रदर्शनामुळे किंवा इतर काही घटनांमुळे लक्षात राहतोच. या सर्वांवर कडी म्हणजे ज्यावेळी त्या वर्ल्डकपसाठीच्या जाहिराती येतात त्या चिरकाल लोकांच्या लक्षात राहतात.

आज अशाच काही लोकांच्या मनात वर्ल्डकपच्या दरम्यान घर केलेल्या जाहिरातींचा आढावा घेऊया.

१९९२ विश्वचषक स्पर्धा

१९९२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या या स्पर्धेसाठी सर्वप्रथम गीत तयार केले गेले. ” वर्ल्ड इज कमिंग डाउन, अॅण्ड फ्लॅग्ज आर अप !” असे या गाण्याचे बोल होते.

लोकांनी प्रथमच अशाप्रकारे वर्ल्डकपची जाहिरात पाहिली. या गीतात सर्व सहभागी देशांच्या ध्वजांचा तसेच प्रत्येक संघातील काही दिग्गज खेळाडूंचा समावेश होता.

PAKISTAN WORLD CUP CRICKET 1992, THEME SONG OF CRICKET WORLD CUP 1992, IMRAN KHAN, (BY HASEEB KARIM)

१९९६ विश्वचषक स्पर्धा

सुप्रसिद्ध कव्वाली गायक नुसरत फतेह अली खान यांनी गायलेल्या ‘छोकरा’ या गीताने विश्वचषकात रंग भरला होता. भारत, पाकिस्तान व श्रीलंका संघांनी या स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते.

भारतीय आणि पाकिस्तानी शैलीच्या संगीताचा वापर अतिशय उत्तम रीतीने या गीतात केला गेला होता.

1996 Cricket World cup song-Chokra

१९९९ विश्वचषक स्पर्धा

१७ वर्षानंतर विश्वचषक इंग्लंड मध्ये परत भरवला जात होता. त्यावेळी, शंकर महादेवन यांच्या आवाजात भारतीय संघाला प्रोत्साहित करण्यासाठी ‘ कमॉन इंडिया’ हे गीत तयार केले होते.

याच सोबत, संजय मिश्रा यांच्या जाहिराती दरम्यान येणाऱ्या ‘अॅपल सिंग’ या विनोदी भूमिकेला प्रेक्षकांनी दाद दिली होती.

Come on India Dikha Do - 1999 World Cup Song

२००३ विश्वचषक स्पर्धा

द. आफ्रिका येथे प्रथमच झालेल्या वर्ल्डकपमध्ये पेप्सी या शीतपेयाच्या जाहिरातीने कमाल केली होती. या स्पर्धेचे थीम सॉंग ‘वेलकम टू अवर होम’ हेदेखील खूप प्रसिद्ध झाले.

पेप्सीच्या जाहिरातीमध्ये सचिन तेंडुलकर, शेन वॉर्न आणि कार्ल हूपर यांच्या होनोलुलु या विनोदी जाहिरातीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. असे असले तरी वॉर्नला मात्र हा विश्वचषक पुढे खेळता आला नव्हता.

Pepsi Ad during cricket worldcup 2003.(shane warne carl hooper Sachin tendulkar)

याच विश्वचषकात ‘२० साल बाद’ अशा टायटल खाली आलेल्या जाहीरातीनेही क्रिकेटप्रेमींचे चांगलेच मनोरंजन केले होते.

https://www.youtube.com/watch?v=P6og9Np3MW4

२००७ विश्वचषक स्पर्धा

वेस्टइंडीज येथे भरवली गेलेली ही विश्वचषक स्पर्धा विश्वचषकाचा इतिहासातील सर्वात रटाळ स्पर्धा म्हणून ओळखले जाते. भारत आणि पाकिस्तान सारखे मोठे संघ बाहेर पडल्याने स्पर्धेतील रस निघून गेला होता.

कॅरिबियन कलाकारांनी तयार केलेले ‘ इन धिस ब्यूटीफुल गेम’ हे गीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते.

Official ICC Cricket World Cup Theme Song 2007 - Rupee, Shaggy, Faye-Ann Lyons "Game Of Love & Unity"

२०११ विश्वचषक स्पर्धा

१९९६ नंतर प्रथमच पुन्हा एकदा आशिया खंडात विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे थीम सॉंग आणि जाहिराती यांना तुफान प्रतिसाद मिळाला होता.

मनोज यादव यांनी लिहिलेले ‘दे घुमा के’ हे गीत शंकर महादेवन यांच्या स्वरात स्वरबद्ध केले गेलेले. या गीताचे श्रीलंकन आणि बांगलादेशी अशा दोन्ही भाषेत सुद्धा गीत तयार होते. दे घुमा के आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट थीम सॉंग म्हणून ओळखले.

https://www.youtube.com/watch?v=7LxrkrIdj6Q

याच बरोबर, पेप्सी कंपनीने ‘ओह येस ! ‘ हे उत्पादन बाजारात आणले होते. त्यासाठी अनेक दिग्गज खेळाडूंनी जाहिरात केली. यामध्ये धोनी हेलिकॉप्टर शॉट शिकताना, हरभजन दुसरा शिकताना तर दिलशान त्याचा दिल स्कुप शॉट शिकताना दाखवले गेले होते. यांच्यासोबत विरेंद्र सेहवाग, केविन पीटरसन हे खेळाडू आणि बिली बाऊडेन हे पंच देखील या जाहिरातीत दिसले होते.

Pepsi Oh Yes Abhi Cricket TV Commercial

२०१५ विश्वचषक स्पर्धा

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे आयोजित करण्यात आलेल्या या, विश्वचषकासाठी तयार केलेले ” इट इज टाईम फोर अस ” हे गीत त्याच्या संगीतासाठी ओळखले जाते. संगीता सोबतच पडद्यावर दिसणारे इफेक्ट देखील लोकांना आवडले होते.

२०१५ विश्वचषकाच्या थीम सॉंग पेक्षा भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान क्रिकेटच्या मैदानावर रंगणाऱ्या रनयुद्धासाठी ” मौका मौका ” हे गीत तुफान गाजले. पाकिस्तान भारताला कधीही विश्वचषकात हरवू शकला नाही हे यात अधोरेखित केले होते.

[ICC WORLD CUP2015]  official video song-'WDL-Bob's beat' #bts

२०१९ विश्वचषक स्पर्धा

इंग्लंडमध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी ” स्टॅन्ड बाय ” हे थीम सोंग तयार केले गेले होते. इंग्लंडच्या पारंपारिक संगीताचा यावर प्रभाव होता.

LORYN - Stand By (#CWC19) (Official Video) ft. Rudimental

भारतीय संघाला प्रोत्साहित करण्यासाठी स्टार स्पोर्ट वाहिनीने ” क्राऊन क्रिकेट का हम ले जायेंगे ” हे गीत विनोदी ढंगाने बनविले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---