जगात वेगाचा बादशाह म्हणून दिग्गज धावपटू उसेन बोल्टला ओळखले जाते. त्याच्या वेगाची बरोबरी करणे हे कोणत्याही धावपटूचे स्वप्न असते. पण एका १७ वर्षीय अमेरिकन धावपटूने बोल्टचे चक्क २ विश्वविक्रम मागे टाकले आहेत. या धावपटूचे नाव एरियन नाईटन असून त्याने काही आठवड्यांपूर्वी बोल्टचा १८ वर्षांखालील स्तरावरील विश्वविक्रम मोडला होता. त्यानंतर सोमवारी एरियनने बोल्टचा २० वर्षांखालील स्तरावरील देखील एक विश्वविक्रम मोडला आहे.
सध्या अमेरिकेत ऑलिंपिक ट्रायल्स सुरु आहेत. या स्पर्धेतून अमेरिकन धावपटू यावर्षी जुलैमध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिंपिकसाठी पात्रता सिद्ध करत आहेत. या स्पर्धेतील पुरुषांच्या २०० मीटर स्पर्धेच्या उपांत्य फेरीत एरियनने १९.८८ सेंकदात शर्यत पूर्ण करत बोल्टचा १९.९३ सेंकदाचा २० वर्षांखालील स्तरावरील विक्रम मोडला आहे. बोल्टने २००४ मध्ये या विक्रमाची नोंद केली होती.
या स्पर्धेतील २०० मीटर शर्यतीची अंतिम फेरी युजीनमध्ये काही तासातच पार पडेल. या शर्यतीत सध्याचा विश्वविजेता धावपटू नोह लाइल्स यांच्या अव्वल क्रमांकालाही एरियनकडून धोका असेल. त्यामुळे ही शर्यत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
एरियनने या स्पर्धेची २०० मीटर शर्यत गटातील सुरुवात २०.०४ सेकंदाची वेळ नोंदवत हिट्मध्ये विजयाने केली होती. यावेळी त्याने स्वत:चाच १८ वर्षांखालील विक्रम मोडला नाही तर बोल्टच्याही विक्रमाला मागे टाकले.
17-year-old Erriyon Knighton and @LylesNoah lead the second 200m semi of the night ⚡️@usatf | #TrackFieldTrials21 x #TokyoOlympics
📺 NBC / https://t.co/X4DjdJu4po pic.twitter.com/336j9Tgtsa
— NBC Olympics & Paralympics (@NBCOlympics) June 27, 2021
एरियनने हा या जानेवारीमध्ये प्रोफेशनल म्हणून पदार्पण केले आहे. तरी अजून तो २ वर्षे ज्यूनियर स्तरावर खेळू शकतो. एरियनने ज्यूनियर स्थरावर केवळ विश्वविक्रमच केले नाहीत तर त्याने ऑलिंपिकमध्ये विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या नोह लाइल्सला सलग २ वेळा पराभूत केले आहे. नोह हिट्समध्ये २०.१९ सेंकदाची वेळ नोंदवत दुसरा आला होता. तर फ्रेड केर्लीने २०.४१ सेंकदाची वेळ नोंदवली होती. तसेच उपांत्य फेरीत नोहने १९.९१ सेंकदाची वेळ नोंदवली.
एरियनचा सध्याचा फॉर्म पाहाता तो ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे टोकियोतून तो ऑलिंपिक स्पर्धेत पदार्पण करु शकतो. अमेरिकन ऑलिंपिक ट्रायल्समध्ये प्रत्येक स्पर्धेत पहिले ३ क्रमांकावर राहणाऱ्या खेळाडूंना ऑलिंपिक संघात जागा मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघासाठी टी२० क्रिकेटच्या बाबतीत श्रीलंकेचा दौरा अगदी सोपा; पाहा ‘ही’ आकडेवारी
“श्रीलंका दौऱ्यावर सर्व खेळाडूंना संधी देणे शक्य नाही”, द्रविडचे मोठे भाष्य