---Advertisement---

वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा विजयी चौकार! विराटच्या शतकाने गहुंज्यात रंगला अविस्मरणीय सामना

Virat Kohli
---Advertisement---

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला गुरुवारी (19 ऑक्टोबर) बांगलादेशविरुद्ध मोठा विजय मिळवता आला. विराट कोहली, शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांच्या महत्वपूर्ण खेळीमुळे भारताने हा सामना 7 विकेट्सने जिंकला. विराटने शेटच्या चेंडूवर षटकार मारलून संघाला विजय मिळवून दिला. सोबतच आपले 48वे वनडे शतक देखील पूर्ण केले.

उभय संघांतील हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळला गेला. विराट कोहली याने भारतासाठी सर्वोत्तम प्रदर्शन केले. 97 चेंडूत 103* धावांची अप्रतिम खेळी विराटने केली. तसेच सलामीवीर शुबमन गिल यानेही 55 चेंडूेत 53 धावा केल्या. सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये होता. मात्र, 40 चेंडूत 48 धावा केल्यानंतर त्याने सीमारेषेजवळ झील दिल्याने त्याचे अर्धशतक पूर्ण झाले नाही. भारताला विजायासाठी 257 धावांचे लक्ष्य मिळाले होते. 50 षटकांच्या या सामन्यात भारतीय संघ, 41.3 षटकांमध्ये अवघ्या तीन विकेट्सच्या नुकसानावर विजयी झाला. गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजा यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

दुसरीकडे बांगलादेशसाठी त्यांच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतक केली होती. तनझीद हसन याने 43 चेंडूत 51, तर लिटन दास याने 82 चेंडूत 66 धावांची खेळी केली. त्याव्यतिरिक्त मुशफिकूर रहमान याने 38, तर महमुदुल्लाह याने 46 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. बांगलादेशसाठी गोलंदाजी विभागात मेहदी हसन शांतो याने शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. रोहित शर्माची विकेट हसन महमूद याला मिळाली.

या विजयानंतर भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याची अपेक्षा चाहत्यांना होती. मात्र, संघाला दुसऱ्याच क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या न्यूझीलंड संघानेही आतापर्यंत चार पैकी चार सामने जिंकले आहेत. मात्र, भारताचा नेट रन रेट न्यूझीलंडच्या तुलनेत कमी असल्यामुळे भारत दुसऱ्या आणि न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे.

विश्वचषकातील 17व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

बांगलादेश- लिटन दास, तनजीद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहदी हसन मिराज, तौहिद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्लाह, नसूम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम.

महत्वाच्या बातम्या – 
जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये विराटचे स्थान अधिक भक्कम, श्रीलंकेच्या महान फलंदाजाचा विक्रम झटक्यात मोडला
आनंदी आनंद गडे! गिलच्या दोन कडक सिक्सने सारा झाली खूश, व्हिडिओ पाहाच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---