क्रिकेटविश्वात आजवर एकाहून एक सरस क्षेत्ररक्षक होऊन गेले आहेत आणि आजही आहेत. सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलूंपैकी एक असणारा ३२ वर्षीय रविंद्र जडेजा याचीही जगातील सर्वश्रेष्ठ क्षेत्ररक्षकांमध्ये गणना केली जाते. त्याची मैदानावर अप्रतिम झेल पकडण्याची आणि चपळाईने फलंदाजांना धावबाद करण्याची शैली केवळ क्रिकेटरसिंकानाच नव्हे भल्याभल्या क्रिकेटपटूंनाही भोवते.
परंतु एखाद्या वेळी त्याच्या हातून क्षेत्ररक्षणात चूक झाली, तर चाहते त्याच्यावर टिका न करता त्याच्या प्रयत्नांचे कौतुक करतात. यामुळे आपल्याला अतिशय आनंद वाटल्याचे स्वत: जडेजाने सांगितले आहे.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना जडेजा म्हणाला की, “मला खूप चांगले वाटते जेव्हा लोक माझ्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक करतात. भलेही त्यांनी माझ्या परिश्रमांना वास्तवात पाहिले नसेल. परंतु त्यांना माझ्या मेहनतीची जाणीव असावी. म्हणूनच तर एखाद्या वेळी माझ्याकडून झेल सुटला तर लोक माझी टिका करत नाहीत. याउलट ते म्हणतात की होतं, असं कधी-कधी होतं. हे ऐकून खरच फार बर वाटत.”
याबरोबरच जडेजाने त्याच्या क्षेत्ररक्षण क्षमतेचाही खुलासा केला. आपल्या वडिलांपासून आलेली आनुवंशिकता आणि आपल्या कठोर मेहनतीच्या संयोजनामुळे हे साध्य झाले असल्याचे त्याने सांगितले आहे. याबरोबरच आपल्याला एक महान क्षेत्ररक्षण बनवण्यात बालपणीचे प्रशिक्षक महेंद्र सिंग चौहान यांचाही वाटा असल्याचे त्याने सांगितले आहे.
जडेजाच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा प्रत्यय आयपीएल २०२१ मध्ये पाहायला मिळाला होता. आयपीएलचा हंगाम स्थगित होण्यापुर्वी जडेजा प्रतिनिधित्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने एकूण ७ सामने खेळले होते. दरम्यान जडेजाने तब्बल ८ झेल पकडले होते. याबरोबरच तो आयपीएल इतिहासात फलंदाजांना सर्वाधिकवेळा धावबाद करणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या यादीत अव्वलस्थानी आहे. त्याने आतापर्यंत जवळपास २४ फलंदाजांना धावबाद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघासाठी तयार केलेल्या जाळ्यात इंग्लंड संघही अडकू शकतो, दिग्गजाने दिला इशारा
आयपीएल २०२१ साठी ‘या’ मोठ्या स्पर्धेच्या वेळापत्रकात होणार बदल? बीसीसीआय करत आहेत चर्चा