ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर याने भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली. ऑस्ट्रेलियन संघ सध्या चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये यजमान भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना वॉर्नरच्या डोक्याला चेंडू लागला होता, ज्यामुळे मालिकेतील पुढच्या दोन सामन्यांमध्ये खेळणार नाहीये. पण भारतीय दिग्गज आकाश चोप्रा याच्या मते वॉर्नर संघातून बाहेर झाला असला तरी ऑस्ट्रेलियन संघाला यामुळे काही फरक पडणार नाहीये.
डेविड वॉर्नर (David Warner) ऑस्ट्रेलियन संघाच्या महान सलामीवीर फलंदाजांपैकी एक असला, तरी सध्या त्याचा फॉर्म खराब आहे. याच कारणास्तव वॉर्नर दुखापतीमुळे मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळला नाही, तरी संघाला त्याचे जास्त काही नुकसान होणार नाही, असे आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांना वाटते. भारतीय संघाने या कसोटी मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकला. त्यानंतर उभय संघांतील दुसऱ्या सामन्यात भारताने 6 विकेट्स राखून विजय मिळवला. वॉर्नरने पहिल्या सामन्यात 1 आणि 10 धावांची खेळी केली, तर दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात त्याने 15 धावा केल्या. दुखापतीमुळे वॉर्नर या सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजीला आला नाही. भारतीय संघ सध्या या मालिकेत 2-0 अशा आघाडीवर आहे आणि त्यांना बॉर्डर गावसकर ट्रॉफी संघाने पुन्हा रिटेन केली आहे.
भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्रा वॉर्नरला झालेल्या दुखापतीविषयी म्हणाला, “डेविड वॉर्नर मायदेशात परतला आहे. तो दुखापतीचा शिकार आहे. त्याला हलके फ्रॅक्चर झाल्याचे बोलले जात आहे. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी तो उपलब्ध नसेल. यामुळे ऑस्ट्रेलिया संघ कमजोर होईल का? तर मला वाटत नाही की, असे होईल. भारत आणि रविचंद्रन अश्विनविरुद्ध खेळताना वॉर्नरचे आकडे ज्या पद्धतीचे राहिले आहेत, ते पाहता ऑस्ट्रेलियन संघाला याचा काही फरक पडेल असे वाटत नाही.”
दरम्यान, दिल्ली कसोटीत वॉर्नरने अर्ध्यातून माघार घेतल्यानंतर मॅट रेनशॉ याला संघात घेतले गेले. या सामन्याच्या दुसऱ्या डावात उस्मान ख्वाजाच्या साथीने ट्रेविस हेड याने चांगली सुरुवात केली. माहितीनुसार वॉर्नर भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी पुन्हा संघात सामील होऊ शकतो, पण याविषयी अध्यावर कुठली ठोस माहिती आली नाहीये. उभय संघांतील ही वनडे मालिका 17 मार्च रोजी सुरू होईल. (‘Even if David Warner doesn’t play, it doesn’t matter to the team’, statement of the legendary batsman)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला प्रीमिअर लीगची चांदी! बीसीसीआयने टाटांकडे सोपवली ‘ही’ प्रचंड मोठी जबाबदारी
‘त्याने कोणता गुन्हा केला नाहीये…’, आकाश चोप्रा – वेंकटेश प्रसाद वादानंतर हरभनजची प्रतिक्रिया