---Advertisement---

महिला टी२० वर्ल्डकप: पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत; जाणून घ्या स्पर्धेबद्दल सर्वकाही…

---Advertisement---

उद्यापासून(21 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलिया येथे महिला टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. हा 7 वा महिला टी20 विश्वचषक असणार आहे. दर दोन वर्षांनी होणारी ही विश्वचषक स्पर्धा यावर्षी 21 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत रंगणार आहे. या विश्वचषकाचा अंतिम सामना 8 मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी पार पडणार आहे.

या महिला विश्वचषकामध्ये गतविजेता ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, बांगलादेश आणि थायलंड या 10 संघांचा समावेश आहे. तसेच या 10 देशांच्या संघाची अ आणि ब गटात विभागणी करण्यात आली आहे.

भारताचा या विश्वचषकाच्या साखळी फेरीसाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांगलादेशसह अ गटात समावेश आहे. तर ब गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान आणि थायलंड संघाचा समावेश आहे. थायलंड संघाचा हा पहिलाच विश्वचषक आहे.

या स्पर्धेत एकूण 23 सामने होणार आहेत. 21 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान या स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने होतील. त्यानंतर दोन्ही गटातील प्रत्येकी अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. दोन्ही उपांत्य सामने 5 मार्चला सिडनीमध्ये पार पडतील. त्यानंतर 8 मार्चला मेलबर्न येथे अंतिम सामना होईल. हे सर्व सामने सिडनी, कॅनबेरा, पर्थ आणि मेलबर्न या शहरांमध्ये खेळले जाणार आहेत.

तसेच या स्पर्धेतील सलामीचा सामना ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारतीय महिला संघात 21 फेब्रुवारीला सिडनी येथे होईल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरुवात होईल.

भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यानंतर साखळी फेरीत बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका विरुद्ध अनुक्रमे 24 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी आणि 29 फेब्रुवारीला सामने खेळेल.

आत्तापर्यंतचे महिला टी20 विश्वचषकाचे विजेते – 

आत्तापर्यंत सर्वाधिकवेळा ऑस्ट्रेलिया संघाने महिला टी20 विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आहे. त्यांनी 2010, 2012, 2014 आणि 2018 असे 4 विश्वचषक जिंकले आहेत. तर 2009 ला इंग्लंड महिला संघाने आणि 2016 ला वेस्ट इंडीज महिला संघाचे हा विश्वचषक जिंकला आहे.

2020 आयसीसी महिला टी20 विश्वचषकात असे होतील भारताचे सामने –  

साखळी फेरी –

21 फेब्रुवारी – भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला, सिडनी (वेळ – दुपारी 1.30 वाजता)

24 फेब्रुवारी – भारतीय महिला विरुद्ध बांगलादेश महिला, पर्थ (वेळ – दुपारी 4.30 वाजता)

27 फेब्रुवारी – भारतीय महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला, मेलबर्न (वेळ – सकाळी 8.30 वाजता)

29 फेब्रुवारी – भारतीय महिला विरुद्ध श्रीलंका महिला, मेलबर्न (वेळ – दुपारी 1.30 वाजता)

उपांत्य फेरी – 

5 मार्च – पहिला सामना -अ गटातील अव्वल क्रमांकचा संघ विरुद्ध ब गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ, सिडनी (वेळ – सकाळी 8.30 वाजता)

5 मार्च – दुसरा सामना – ब गटातील अव्वल क्रमांकचा संघ विरुद्ध अ गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ, सिडनी (वेळ – दुपारी 1.30 वाजता)

अंतिम सामना – 

8 मार्च – उपांत्य सामना 1 मधील विजेता विरुद्ध उपांत्य सामना 2 मधील विजेता, मेलबर्न (वेळ – दुपारी 1.30 वाजता)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---