आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, जे आपल्या आगळ्या वेगळ्या सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध आहेत. काही खेळाडू शतक झळकावल्यानंतर, झेल टिपल्यानंतर तसेच गडी बाद केल्यानंतर हटके सेलिब्रेशन करताना दिसून येत असतात. हटके सेलिब्रेशन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वेस्ट इंडिजचे खेळाडू सर्वोच्च स्थानी आहेत. दरम्यान नुकत्याच सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत एविन लुईसने शतक झळकावल्यानंतर केलेल्या हटके सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतील २७ वा सामना सेंट किट्स एंड नेविस विरुद्ध ट्रीनबागो नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात सेंट किट्स एंड नेविस संघातील विस्फोटक फलंदाज एविन लुईसने अवघ्या ५२ चेंडूंमध्ये १०२ धावांची विस्फोटक खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ११ षटकार लगावले होते. याचा अर्थ असा की, त्याने अवघ्या १६ चेंडूंमध्ये चौकार-षटकारांच्या मदतीने ८६ धावांची खेळी केली.
एविन लुईस जेव्हा ९५ धावांवर फलंदाजी करत होता, त्यावेळी गोलंदाजाने लेग साइडच्या दिशेने शॉर्ट चेंडू टाकला होता. .यावर एविन लुईसने आत येऊन लेग साइडच्या षटकार मारत आपले शतक पूर्ण केले. जेव्हा चेंडू त्याच्या बॅटला लागला तेव्हाच त्याला जाणवले की, तो चेंडू सीमारेषच्या बाहेर जाईल. त्यावेळी त्याने शॉट मारल्यानंतर १ सेकंद चेंडूकडे पाहिले आणि बॅट मागे फेकून दिली. बॅट फेकल्यानंतर लुईसने हाथ पसरवून हटके स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले.
गेले अनेक महिने तो चांगली खेळी खेळण्याच्या प्रतीक्षेत होता. अखेर तो फॉर्ममध्ये परतला आहे. त्यामुळे त्याने असे हटके सेलिब्रेशन केले असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.(Evin Lewis celebration after hitting century, watch video)
Evin Lewis ???? This #IPL gonna be good! @rajasthanroyals ???????? #RR pic.twitter.com/kumGve2Hrc
— Frank (@franklinnnmj) September 12, 2021
राजस्थान रॉयल्स संघाचे करणार प्रतिनिधित्व
एविन लुईस इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळताना दिसून येणार आहे. त्याची विस्फोटक फलंदाजी पाहून राजस्थान रॉयल्स संघाचा आनंद गगनात मावेनासा झाला असेल.
तर या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, सेंट किट्स एंड नेविस संघाने ट्रिनबागो नाईट्स रायडर्स संघाला ८ गडी राखून पराभूत केले. सेंट किट्स एंड नेविस संघाने आतापर्यंत एकूण ९ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना ६ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. या विजयासह सेंट किट्स एंड नेविस संघाने गुणतालिकेत पहिले स्थान टिकवून ठेवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
युएई टप्प्यात ‘हे’ समालोचक आयपीएल सामन्यांमध्ये आणणार आणखी रंगत, १० भारतीय दिग्गजांचा समावेश
शास्त्री आणि सहकारी ‘या’ दिवशी परतणार मायदेशी! पण त्याआधी कोरोना निगेटिव्ह येणे आवश्यक
टी२० विश्वचषक २०२१ साठी ‘असे’ आहेत सर्व १६ संघ, पाहा प्रत्येक टीम फक्त एका क्लिकवर