---Advertisement---

माजी क्रिकेटपटूला मिळणार 91 कोटींची भरपाई, ‘टॉप गीअर’ शूटदरम्यान घडला होता भीषण अपघात

On: शनिवार, ऑक्टोबर 14, 2023 4:02 PM
Andrew Flintoff
---Advertisement---

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफला लवकरच 9 दशलक्ष पौंड (91 कोटी रुपये) भरपाई मिळणार आहे. ही भरपाई बीबीसी त्याला देणार आहे. वास्तविक, बीबीसीच्या ‘टॉप गियर’ शोच्या शूटिंगदरम्यान फ्लिंटॉफचा कार अपघात झाला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली होती. अनेक महिन्यांच्या वाटाघाटीनंतर फ्लिंटॉफ आणि बीबीसी यांच्यात एक करार झाला आहे. या करारानुसारच फ्लिंटॉफची भरपाई निश्चित करण्यात आली आहे.

डिसेंबर 2023 मध्ये बीबीसीच्या प्रसिद्ध ऑटो शो ‘टॉप गियर’ (Top Gear) साठी शूटिंग करताना अँड्र्यू फ्लिंटॉफ (Andrew Flintoff) थोडक्यात मृत्यूपासून बचावला. दक्षिण लंडनमधील डनफोल्ड पार्क एरोड्रोममध्ये हा अपघात झाला होता. अपघातानंतर लगेचच त्याला विमानाने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर तो बराच वेळ कॅमेऱ्यासमोर येऊ शकला नाही. सप्टेंबरमध्ये नऊ महिन्यांनंतर तो बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही जखमांच्या अनेक खुणा आहेत.

या कराराबद्दल सांगताना बीबीसी स्टुडिओच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, “बीबीसी स्टुडिओने अँड्र्यू फ्लिंटॉफ यांच्याशी करार केला आहे. आम्ही त्याला कामावर परतण्यासाठी आणि त्याच्या भविष्यातील योजनांना पाठिंबा देत राहू. आम्ही त्याची मनापासून माफी मागतो आणि त्याच्या ठिक होण्यासाठी आणि त्याला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहू.”

अँड्र्यू फ्लिंटॉफ एकेकाळी इंग्लंडचा सर्वात मोठा मॅच विनर खेळाडू होता. त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने इंग्लंडला अनेक मोठे विजय मिळवून दिले आहेत. या शक्तिशाली अष्टपैलू खेळाडूच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 3845 धावा आणि 226 विकेट्स आहेत. फ्लिंटॉफने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3394 धावा आणि 169 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 8 शतके आहेत.

फ्लिंटॉफने 1998 मध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्दापण केले होते. 2009 पर्यंत तो इंग्लंड संघाचा भाग होता. मात्र, त्यानंतर दुखापतीमुळे तो संघातुन आत-बाहेर होत राहिला. फ्लिंटॉफच्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने 2005 मध्ये खेळलेली ऍशेस मालिका जिंकली होती. (Ex-cricketer will get compensation of 91 crores a terrible accident happened during the shoot of Top Gear)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---