भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युसूफ पठाण 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरला होता. युसूफ पठाण पश्चिम बंगालमधील बहरामपूर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसकडून 65000+ मताधिक्यांनी विजयी झाल्याची बातमी समोर येत आहे.
युसूफ पठाणची लढत काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी आणि भारतीय जनता पक्षाचे डॉ. निर्मलकुमार शहा यांच्याशी होती. निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी सुरू झाली तेम्हा पासून युसूफ पठाण सुरुवातीपासूनच अघाडीवर असल्याचे दिसत होते.
युसूफ पठाण पहिल्यांदाच निवडणूक लढवत होता. त्यांनी ममता बॅनर्जींच्या मित्रपक्ष तृणमूल काँग्रेसशी हातमिळवणी केली. पठाण पहिल्यांदाच निवडणुकीच्या खेळपट्टीवर चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना यूसुफ पठाण लोकसभेचा सामना जिंकला आहे. बहारमपूरचे विद्यमान खासदार अधीर रंजन चौधरी यांनी कडवी टक्कर दिली मात्र क्रिकेटर युसूफ पठाण समोर पराभवास सामोरे जावे लागले आहे.
युसूफ पठाणनी काँग्रेसचे दिग्गज नेते अधीर रंजन चौधरी यांचा 59351 मतांनी पराभव केला. अधीर रंजन चौधरी 1999 पासून बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. मात्र, दशकभरानंतर क्रिकेटपटू युसूफ पठाणकडून त्यांचा बालेकिल्ल्यातून पराभव झाला. भारतीय निवडणूक पद्धतीनुसार युसूफ पठाणला 408240 मते मिळाली. तर अधीर रंजन चौधरी यांना 348889 मते मिळाली.
पाच वेळाचे खासदार अधीर रंजन चौधरींचा पराभव
अधीर रंजन चौधरी यांनी 2019 च्या गेल्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या अपूर्व सरकारचा 80,696 मतांनी पराभव केला होता. अधीर रंजन सलग पाच वेळा या जागेवरून खासदार झाले आहेत. 1999 मध्ये पहिल्यांदा त्यांना या जागेवरून खासदारकी मिळाली. पण आता पहिल्यांदाच झुंज देणारा युसूफ पठाण त्याला तगडी टक्कर देत युसूफ पठाणने या जागेवर विजय मिळवला आहे.
युसूफ पठाणची क्रिकेट मधील कारकीर्द
युसूफ पठाणने 2007 ते 2012 पर्यंत भारतीय संघासाठी एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. पठाणने 57 एकदिवसीय आणि 22 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने एकदिवसीय सामन्याच्या 41 डावात 810 धावा केल्या, ज्यात 2 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे आणि 50 डावात गोलंदाजी करताना 33 बळी घेतले. याशिवाय पठाणने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 18 डावात 236 धावा केल्या आणि 17 डावात गोलंदाजी करताना 13 बळी घेतले.
महत्तवाच्या बातम्या-
भारतीय संघाची ट्रॉफीपेक्षा ‘या गोष्टीवर’ जास्त भर! राहुल द्रविडने केली खुलासा
सुनील गावसकरांनी निवडली, भारतीय संघाची प्लेइंग 11
हे दोन संघ टी20 विश्वचषकात टीम इंडियासाठी ‘घातक’ अद्याप, एकही सामना जिंकण्यात अयशस्वी!