भारतीय संघाला २०११मध्ये क्रिकेट विश्वचषकात विजय मिळवून देणारे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचा जबडा तुटला आहे. कर्स्टन सध्या बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरीकेंस संघाचे प्रशिक्षक आहेत.
सरावादरम्यान होबार्ट हरीकेंस संघाचा सलामीवीर डार्सी शॉर्टचा चेंडू लागल्यामुळे त्यांचा जबडा तुटला आहे. डार्सी शॉर्टने मारलेला एक शॉट थेट गॅरी कर्स्टन यांच्या तोंडावर लागला. त्यामुळे त्यांचा एक दातही तुटला.
यावेळी ते संघाचे शिबीर घेत होते. त्यावेळी डार्सी शॉर्टने एक जोरदार फटका कर्स्टन यांच्याकडे मारला. हा फटका इतका वेगवान होता की त्यांना चेंडूपासून दूर जाता आले नाही. या घटनेनंतर त्यांना लगेच दवाखान्यात नेण्यात आले.
कर्स्टन यांच्या तोंडाला खूप सूज आली आहे परंतु शस्त्रक्रियेची त्यांना कोणतीही गरज नसल्याचं बोललं जात आहे.