भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळ क्रिकेट सर्व आबालवृद्ध खेळत असतात. अगदी घराच्या अंगणापासून मोठ्यामोठ्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये व्यवसायिक व शौकीन क्रिकेटपटू आपला खेळ दाखवताना दिसतात. केवळ एक बॅट आणि बॉल यांनी हा खेळ कोठेही सुरू होऊ शकतो. ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर चामड्याच्या चेंडूने खेळला जाणारा हा खेळ भारतातील रस्त्यारस्त्यांवर टेनिस बॉलने खेळला जातो.
महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक मोठ्या स्पर्धा झालेल्या पाहायला मिळतात. ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंनी आपल्या कौशल्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगलेच नाव कमावले आहे. आता टेनिस बॉल क्रिकेटची लोकप्रियता पाहून भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी टेनिस बॉल क्रिकेटचा विश्वचषक खेळला जावा, अशी इच्छा व्यक्त केली.
काय म्हणाले कांबळी?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून देणार्या कांबळी यांनी मुंबई शेजारील दिवा येथे एका टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात बोलताना अशा स्पर्धेचा विश्वचषक व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. कांबळी म्हणाले,
“मला वाटते टेनिस बॉल क्रिकेटचे भविष्य उज्वल आहे. मीदेखील सर्वप्रथम टेनिस बॉलनेच क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. या सर्व खेळाडूंना पाहून मला वाटते की या प्रकाराचा दर्जा वेगळ्या उंचीवर गेला आहे. ग्रामीण भागातून खूप प्रतिभावंत क्रिकेटपटू पुढे येत आहेत. माझी तर इच्छा आहे की, टेनिस बॉल क्रिकेटचा विश्वचषक खेळला जावा. संधी मिळाल्यास मलाही टेनिस बॉल क्रिकेट खेळायला आवडेल.”
कांबळी यांनी या कार्यक्रमात आपले लहानपणीचे अनेक किस्से सांगितले. आपले प्रशिक्षक रमाकांत आचरेकर हे आम्हाला कशाप्रकारे शिक्षा द्यायचे याबाबत त्यांनी उलगडा केला.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईचा अभिमान पोलार्ड तात्या! अवघ्या ६ कोटीत मान्य केले रिटेंशन