माजी भारतीय क्रिकेटपटू केएस श्रावंती नायडू हिची आई एसके सुमन यांचे शनिवारी (२२ मे) दुपारी निधन झाले. बीसीसीआयच्या माजी महिला क्रिकेट संयोजक (दक्षिण विभाग) विद्या यादव यांनी ही माहिती दिली. एसके सुमन यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. या कठीण काळात तिला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आर्थिक मदत केलेली. विराटने त्यांच्यासाठी ६.७७ लाख रुपयांची मदत केली होती.
स्पोर्ट्स स्टारच्या वृत्तानुसार, केएस सुमन यांआन सोडण्यापूर्वी रुग्णालयाने त्यांचे ५.२८ लाखांचे बिल माफ केले होते. यासाठी विद्या यादव यांनी तेलंगणा सरकारचे आभार मानले. त्या म्हणाल्या की, “केएस श्रावंती नायडू हिची आई एसके सुमन यांची प्रकृती चिंताजनक असूनही कुटुंबाच्या विनंतीवरून त्यांना सोडण्यात आले.” विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी विद्या यादव यांनी विराट कोहलीला एका ट्विटमध्ये टॅग केले होते, ज्यात त्यांनी श्रावंतीसाठी मदत मागितली होती.
श्रावंती नायडूच्या आईला ६.७७ लाख रुपयांची मदत करून विराट कोहलीने तिच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले. तसेच हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने ५ लाख रुपयांची आर्थिक मदतही पुरविली होती. यानंतर विद्या यादव यांनीही या मदतीबद्दल विराट कोहलीचे आभार मानले. भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनीही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर लोकांना मदत करण्याचे आवाहन केले होते. आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह असताना श्रीवंतीने उपचारांसाठी आधीच १६ लाख रुपये खर्च केले होते.
या क्रिकेटपटूंच्या कुटुंबातील सदस्यांचे झाले निधन
कोरोना या साथीच्या आजाराच्या दुसऱ्या लाटेत काही क्रिकेटपटूंच्या कुटुंबीयांना या आजाराची लागण झाली. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंग तसेच, भारताच्या विश्वविजेत्या संघाचा सदस्य लेगस्पिनर पियुष चावला या दोघांच्याही वडिलांचे या आजारात निधन झाले. भारतीय महिला संघाची आक्रमक फलंदाज वेदा कृष्णमूर्ती हिला देखील आपली आई व बहीण या आजारामुळे गमवावी लागली.
भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याच्या आई वडिलांना देखील या आजाराचा संसर्ग झाला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याचेदेखील माता-पिता या आजारातून पूर्णता बरे झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“म्हणून माझी कारकीर्द लांबली नाही”, उथप्पाने स्वतः सांगितले कारण
‘हा’ असेल वेस्ट इंडिजचा भविष्यातील कर्णधार, पोलार्डने केला खुलासा





