पाकिस्तानी संघाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने बाबर आझम याच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. वसीम अक्रमच्या म्हणण्यानुसार, त्याने बाबर आझमला पीएसएलमध्ये कर्णधार होण्यास मनाई केली होती आणि त्याला फक्त पाकिस्तान संघाचे कर्णधारपद करण्यास सांगितले होते. वसीम अक्रम म्हणाला की, “टी20 लीगमध्ये कर्णधार केल्याने कोणतेही कारण नसताना अतिरिक्त दबाव येतो.”
विश्वचषकात 2023 मध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. बाबर आझम (Babar Azam) याच्या नेतृत्वाखाली संघाला केवळ 4 सामने जिंकता आले आणि 5 पराभव पत्करावे लागले. सततच्या टीका आणि दबावामुळे बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.
बाबर आझमने कर्णधारपद सोडल्यानंतर काही वेळातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही नव्या कर्णधारांची घोषणा केली. शान मसूद (Shan Masood) याला कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधार बनवण्यात आलं होतं, तर वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaeen Afridi) याला टी20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपद देण्यात आलं होतं. वनडे कर्णधाराची घोषणा नंतर केली जाईल. याशिवाय संघ व्यवस्थापनातही बदल करण्यात आला. मोहम्मद हाफिज याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ संचालक आणि मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले. तर वहाब रियाझ याच्याकडे मुख्य निवड समितीची जबाबदारी देण्यात आली आहे.
वसीम अक्रम (Waseem Akram) याच्या म्हणण्यानुसार, त्याने काही वर्षांपूर्वी बाबर आझमला कर्णधारपद करण्यास नाकारले होते. स्पोर्ट्सकीडाशी बोलताना तो म्हणाला, “मी काही वर्षांपूर्वी बाबर आझमला लीग क्रिकेटमध्ये कर्णधार होऊ नको असे सांगितले होते. तुम्ही मोठे खेळाडू आहात, पैसे घ्या, खेळ खेळा, धावा करा आणि घरी जा. यानंतर पुढील कार्यक्रमात पुन्हा या. पाकिस्तानचे कर्णधारपद ठीक आहे, पण लीगमुळे अतिरिक्त दडपण येते.”
वसीम अक्रमने पाकिस्तान सुपर लीगमधील कराची किंग्स संघात बाबर आझमसोबत काम केले आहे. (Ex-legendary fast bowler’s shocking revelation Said I give Babar the captaincy)
महत्वाच्या बातम्या
विक्रमवीर वॉर्नर! शानदार शतक ठोकत उद्ध्वस्त केला पाकिस्तानच्या दिग्गजाचा रेकॉर्ड, फक्त 110 कसोटीत…
बाबर आझमला त्याच्या 50 व्या कसोटीपूर्वी मिळाला विशेष सन्मान, कर्णधार शान मसूदने दिली खास भेट