---Advertisement---

प्रतिभेला वयाची मर्यादा नसते! ८१व्या वर्षी माजी आमदाराने भारतासाठी जिंकली २ पदकं

On: मंगळवार, जुलै 12, 2022 4:01 PM
MJ Jacob
---Advertisement---

अशी म्हण आहे की, ‘प्रतिभेला वयाची मर्यादा नसते’. केरळच्या एका माजी आमदाराने ही म्हण सत्यात उतरवली आहे. त्यांचे नाव एम. जे. जॅकब असून त्यांनी वयाच्या ८१व्या वर्षी देशासाठी खेळताना वर्ल्ड मास्टर्स ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२मध्ये दोन पदके जिंकली आहेत. ८० मीटर आणि २०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये त्यांनी २ पदके पटकावण्याची कामगिरी केली आहे.

जॅकब (MJ Jacob) यांनी रविवारी (१० जुलै) फिनलॅण्डमध्ये संपन्न झालेल्या वर्ल्ड मास्टर्स ऍथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये भारताकडून खेळताना ८० मीटर आणि २०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत (hurdles events) २ कांस्य पदके जिंकली आहेत. ऍथलिट्स मास्टर्स चॅम्पियनशीपमध्ये ३५ पेक्षा जास्त वर्षांचे ऍथलिट्स सहभागी होऊ शकतात. जॅकब यांनी ८० वर्षांपेक्षा जास्त वयांच्या श्रेणीतून सहभागी होत २ कांस्य पदकांवर (Two Bronze Medals) आपले नाव कोरले आहे.

विशेष म्हणजे, ही जॅकब यांची चौथी वर्ल्ड मास्टर्स ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप आहे. यापूर्वी फ्रांस (२०१५), ऑस्ट्रेलिया (२०१६) आणि स्पेन (२०१८) मध्ये झालेल्या वर्ल्ड मास्टर्स ऍथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्त्व केले आहे. तसेच जॅकब जपान (२०१४), सिंगापूर (२०१६), चीन (२०१७) आणि मलेशिया (२०१२) या आशियाई मास्टर्स गेम्सचा भाग राहिले आहेत.

क्रिडा मैदानावर आपला दम दाखवणारे जॅकब राजकारणाच्या मैदानातही चमकले आहेत. ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे माजी आमदार राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या केरळ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये टी. एम. जॅकब यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. ते यापूर्वी चारवेळा आमदार राहिले आहेत. तसेच जॅकब यांनी १९८१-८२ आणि १९८९-९९ मध्ये तिरुमराडी पंचायत अध्यक्ष आणि एर्नाकुलम जिल्हा पंचायत सदस्य म्हणूनही काम केले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला ‘मुनाफ पटेल’

वाढदिवस विशेष: परिपूर्णतेचा ध्यास घेतलेला शापित

मराठीत माहिती- क्रिकेटर मुनाफ पटेल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---