विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन आणि जो रूट, मॉडर्न क्रिकेटमधील हे चार फॅब 4. या चौघांनी जवळपास एकाच वेळी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. एकेकाळी ते आपापल्या संघाचे कर्णधार होते, परंतु आता ते फक्त फलंदाज म्हणून खेळत आहेत.
या चार खेळाडूंचा फॅब 4 मध्ये समावेश करण्यात आला, कारण त्यांची खेळण्याची शैली एकसारखीच आहे. परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की एक वेळ अशी होती, जेव्हा विराट कोहलीची फॅब 4 वर पूर्ण हुकूमत होती. विराट कोहली हा एकेकाळी कसोटी क्रिकेटच्या फॅब 4 मध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज होता. परंतु आज परिस्थिती अशी झाली आहे की, प्रत्येकजण विराट कोहलीच्या पुढे गेला आहे.
जर आपण 1 जानेवारी 2021 ला पाहिलं तर, त्यावेळी विराट कोहलीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 27 शतकं होती, तर स्टीव्ह स्मिथ 26 शतकांसह दुसऱ्या स्थानावर होता. तिसऱ्या स्थानावर केन विल्यमसन होता, ज्यानं 23 शतकं झळकावली होती. त्याच वेळी, जो रूट फक्त 17 शतकांसह फॅब 4 मध्ये शेवटच्या स्थानावर होता. परंतु 1 जानेवारी 2025 पूर्वी आकडे पूर्णपणे वेगळे आहेत.
चार वर्षांनंतर जर आपण फक्त फॅब 4 च्या शतकांबद्दल बोललो, तर जो रूटनं त्याच्या शतकांची संख्या दुप्पट केली आहे. तो आता 36 शतकांसह अव्वल स्थानावर गेला आहे. केन विल्यमसन दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या चार वर्षांत त्यानं 10 शतके झळकावली. तो आता 33 शतकांसह फॅब 4 मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. स्टीव्ह स्मिथच्या नावावरही तेवढीच शतकं आहेत, पण त्यानं विल्यमसन पेक्षा जास्त डाव खेळले आहेत. विराट कोहलीला गेल्या चार वर्षांत केवळ 3 शतकं झळकावता आली असून तो पहिल्या स्थानावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. अशा प्रकारे तो या फॅब 4 शर्यतीत खूपच मागे पडला आहे.
फॅब 4 कसोटी शतके
जो रूट – 36 (152 सामने)
केन विल्यमसन – 33 (105 सामने)
स्टीव्ह स्मिथ – 33 (112 सामने)
विराट कोहली – 30 (121 सामने)
हेही वाचा –
वारंवार तेच! विराट कोहलीची पुन्हा तीच चुकी, अत्यंत खराब शॉट खेळून बाद
जसप्रीत बुमराहबाबत वादग्रस्त वक्तव्य, इंग्लिश कमेंटेटरनं मागितली माफी; संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
IND vs AUS; भारतीय गोलंदाज कुठे कमी पडले? गोलंदाजी प्रशिक्षकाने केला खुलासा