---Advertisement---

जगातील पहिलाच प्रयोग- क्रिस्तीयानो रोनाल्डो करणार फेसबुकबरोबर रिएलिटी शो

On: रविवार, जुलै 8, 2018 12:16 PM
---Advertisement---

पोर्तुगाल आणि रिअल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तीयानो रोनाल्डो न्यूयॉर्कमधील फेसबुक वॉच शोमध्ये काम करणार आहे.

फिफा विश्वचषक सुरू होण्याअगोदरच याची चर्चा सुरू झाली होती. तसेच हा शो फक्त मुलींच्या फुटबॉल संघावर आधारित असून तो स्क्रिप्टटेड आहे. रोनाल्डो या शोचे 13 भाग करणार आहे.

या डॉक्यु-सिरिजविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही, परंतु अहवालानुसार फेसबूक यासाठी 10 कोटी डॉलर देणार आहे.

या शोची निर्मिती मॅटॉर कंटेंट आणि क्रीडाच्या प्रसार माध्यम फर्मने केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बेसबॉल ब्रॉडकास्ट तेवढे लोकप्रिय नाही जेवढे अन्य क्रीडा प्रोग्राम अधिक यशस्वी आहेत.

लाव्हर बॉलच्या रिएलिटी शोच्या तीन हंगामांनंतर फेसबुक वॉचने कनिष्ठ बास्केटबॉल लीगबद्दलच्या कार्यक्रमासाठी करार केला.

रोनाल्डोच्या मदतीने फेसबुकला त्यांच्या चाहत्यांना जगभरातून आकर्षित करण्यासाठी उपयोग होतो आहे.

सध्या रशियात सुरू असलेल्या 21व्या फिफा विश्वचषकात रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ बाद फेरीत पराभूत झाल्याने विश्वचषकामधून बाहेर पडला. 30जूनला झालेल्या या सामन्यात त्यांना उरुग्वेकडून 2-1असा पराभवाचा सामना करावा लागला.

रोनाल्डोने या स्पर्धेतील ४ सामन्यात ४गोल केले आहेत. सध्या खेळत असलेल्या फुटबॉलपटूमध्ये सर्वाधिक गोल करण्यात रोनाल्डो पहिल्या स्थानावर आहे. त्याने 154 सामन्यात 85 गोल केले आहेत.

तसेच आतापर्यंत फुटबॉल जगतात सर्वाधिक गोल करण्यामध्ये तो इराणच्या अली दाई यांच्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. अलीने 149 सामान्यत 109 गोल केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

-एशियन गेम्ससाठी भारतीय महिला आणि पुरुष कबड्डी संघाची घोषणा

-फिफा विश्वचषक- तगड्या ब्राझीलला बेल्जियमकडून पराभवाचा झटका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment