ला लीगाच्या प्रक्षेपणाचे हक्क फेसबुकने घेतले आहेत. यामध्ये शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या 2018-19च्या हंगामातील 380 सामने फेसबुकवर मोफत दाखविले जाणार आहेत. तसेच पुढील ला लीगच्या दोन हंगामांचाही यामध्ये समावेश आहे.
भारताबरोबरच अफगानिस्तान, भुटान, नेपाल, बांग्लादेश, मालदिव, श्रीलंका आणि पाकिस्तान येथेही या सामन्यांचे प्रक्षेपण फेसबुकमार्फतच होणार आहेत.
भारतात ला लीगाचे प्रक्षेपणाचे हक्क फेसबुक कडे. ला लीगाच्या अधिकृत पेज आणि सामना असेल त्या संघांच्या पेजवर होईल थेट प्रक्षेपण.
युसीएलच्या प्रक्षेपणाचे हक्क सुद्धा अजुन कोणी घेतले नाहीत. #म #मराठी #LaLigaSantander #Facebook @Maha_Sports @AdityaGund @kridajagat @SherryPaaji— Nachiket (@NachiDharankar) August 14, 2018
याविषयीची आर्थिक माहिती फेसबुक आणि ला लीगाने अजून सांगितलेली नाही. मात्र यामध्ये 717 कोटी रूपंयाचा करार झाल्याचे निश्चित आहे. तसेच ला लीगाच्या प्रक्षेपणाचे हक्क आधी सोनीकडे होते. त्यांनी 2014 आणि 2018च्या हंगामासाठी 254 कोटी रूपये भरले होते.
भारतात फेसबुक वापरकर्त्यांची संख्या तब्बल 270 मिलियनपेक्षा जास्त असल्याने त्याचा फेसबुकला सर्वाधिक फायदा होणार आहे.
ला लीगा प्रमाणेच फेसबुकने काही दिवसांआधीच अमेरिकेतील मेजर लीग बेसबॉलशीही करार केला होता. यावेळी त्यांनी या स्पर्धेचे 25 सामने फेसबुकवर प्रक्षेपित केले होते. सुत्रानुसार, यामध्ये 245 कोटी रूपयांचा करार झाला होता.
फेसबुकप्रमाणेच अॅमेझॉननेही 2019च्या इंग्लिश प्रीमियर लीगच्या 20 सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क विकत घेतले आहेत. तर युरोपियन चॅम्पियन लीगच्या प्रक्षेपणाचे हक्क अजून कोणीही विकत घेतले नाही.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–सलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले
–डीसी युनायटेडच्या विजयात फुटबॉलपटू वेन रूनी चमकला