बांगलादेशला राजकीय (Bangladesh Protest) भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. निदर्शने आणि दंगलींदरम्यान पंतप्रधान शेख हसीना (Bangladesh Pm Sheikh Hasina) यांनी घाईघाईने राजीनामा दिला. त्यानंतर त्या देश सोडून हेलिकॉप्टरने भारतात आल्या. हजारो आंदोलकांनी त्याच्या शासकीय निवासस्थानानर हल्ला केला, दरवाजे तोडले आणि सर्व काही नष्ट केले. यामुळे त्यांना देश सोडून पळून जावे लागले. दरम्यान, सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, दंगलखोरांनी बांगलादेश क्रिकेट संघाचा हिंदू क्रिकेटपटू लिटन दास (Liton Das) आणि माजी खासदार क्रिकेटपटू मशरफे मुर्तझा यांच्या घरांना आग लावली आहे.
बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर हल्ले होत असताना लिटनचे घर जाळल्याची बातमी वणव्यासारखी पसरली. मात्र, एक्सवर पोस्ट लिहिणाऱ्या एका बांगलादेशी पत्रकाराने ही बातमी मूर्खपणाची असल्याचे म्हटले आहे. लिटन दाससोबत अशी घटना घडली नसल्याचा दावा त्याने केला. त्याने लिहिले ’30 मिनिटांत एका खोट्याला 6 हजार लाइक. देशात भीती आणि फूट निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांशी लढण्यासाठी आम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.’ लिटनचे घर म्हणून व्हायरल होत असलेले हे घर मूर्तझा याचे असल्याचे सांगण्यात येतेय.
याशिवाय पंतप्रधानांचे शासकीय निवासस्थान असलेल्या आलिशान ‘गणभवन’वरही जमावाने हल्ला केला. जमावाने त्यांचा टीव्ही, फर्निचर आणि इतर अनेक वस्तू, अगदी कपडे चोरून नेले. शेख हसीना यांनी बांगलादेशातून पलायन करून आपला 15 वर्षांचा सत्तेतील दुसरा कार्यकाळ संपवला आहे. त्यांचे वडील मुजीब उर रहमान यांचा वारसा पुढे चालू ठेवत त्यांनी गेल्या 30 वर्षांपैकी 20 वर्षे बांगलादेशचे नेतृत्व केले. त्यांच्या वडिलांची 1975 मध्ये त्यांच्या कुटुंबासह हत्या झाली होती. शेख हसीना यांचे पुत्र जॉय यांनी, आम्हाला कोणालाही देश सोडायचं नव्हता, मात्र सुरक्षेच्या कारणामुळे आम्हाला ते करावे लागले, असे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट की बाबर कोण आहे उत्कृष्ट फलंदाज? ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य
1820 दिवसांनंतर तुटणार युनिव्हर्स बॉसचा मोठा विक्रम! रोहित शर्मा ठरणार अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा फलंदाज
नीरज चोप्राची फायनलमध्ये धमाकेदार एँन्ट्री, पहिल्याच प्रयत्नात केला भीमपराक्रम!