भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 7 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. पहिला सामना बरोबरीत सोडवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिले. सध्या यजमान संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. तिसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल. या सामन्यात ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा मोठा विक्रमही रोहित शर्माच्या निशाण्यावर असणार आहे.
क्रिकेट जगतातील स्फोटक फलंदाजांपैकी एक असलेला वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज ख्रिस गेल हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज आहे. 14 ऑगस्ट 2019 रोजी खेळने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. त्यानंतर वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता रोहित शर्मा हा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. रोहित यापासून फक्त दोन शॉट्स दूर आहे. गेलने वनडेमध्ये 331 षटकार मारले आहेत. त्याचबरोबर या फॉरमॅटमध्ये रोहितने आतापर्यंत 330 षटकार ठोकले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन षटकारांसह, रोहित गेलला मागे टाकत एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा जगातील दुसरा फलंदाज बनेल.
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे. 398 सामने खेळताना त्याने या फॉरमॅटमध्ये 351 षटकार मारले. यासोबतच गेल आणि रोहित शर्मानंतर या यादीत नाव आहे श्रीलंकेचा दिग्गज सनथ जयसूर्याचे, ज्याने 270 षटकार ठोकले आहेत. एमएस धोनी या यादीत पाचव्या स्थानावर आहे. धोनीने वनडे कारकिर्दीत 229 षटकार मारले.
हेही वाचा-
नीरज चोप्राची फायनलमध्ये धमाकेदार एँन्ट्री, पहिल्याच प्रयत्नात केला भीमपराक्रम!
Paris Olympic 2024: कुस्तीपटू विनेश फोगाटची क्वार्टरफायनलमध्ये थाटात एँट्री…!!!
“तो गर्विष्ठ नाही…” दिग्गज खेळाडूच्या बालपणीच्या प्रशिक्षकानं केला मोठा दावा