देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील काही महिन्यांपासून चांगली कामगिरी करणाऱ्या शुबमन गिलची न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्याला केएल राहुल ऐवजी संघात स्थान मिळाले आहे.
त्याने मागील वर्षीच 19 वर्षांखालील भारतीय संघाच्या विश्वचषक विजयात मोलाचा वाटा उचलला होता. तसेच तो रणजी ट्रॉफीमध्येही चांगला खेळला आहे.
शुबमन गिलबद्दल या आहेत काही खास गोष्टी –
– 8 फेब्रुवारी 1999 मध्ये जन्म झालेल्या शुबमन गिलच्या वडीलांची क्रिकेटपटू बनण्याची इच्छा होती. पण त्यांचे हे स्वप्न पुर्ण न झाल्याने त्यांनी शुबमनने क्रिकेटपटू बनण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यासाठी ते मोहालीमध्ये रहायला आले.
-गिलने 2017 मध्ये पंजाब संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हे पदार्पण त्याने बंगाल विरुद्धच्या सामन्यात केले. या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली. तसेच पुढच्याच सामन्यात 129 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याची 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली.
-2018 मध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात शुबमनने 6 सामन्यात 372 धावा केल्या होत्या. यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
-त्याने 17 वर्षांचा असताना फेब्रुवारी 2017 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमधून विदर्भाविरुद्ध अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
-त्याने त्याआधी 2014 मध्ये 16 वर्षाँखालील पंजाब इंटर डिस्ट्रिक्ट स्पर्धेत 351 धावांची त्रिशतकी खेळी केली. त्याचबरोबर निर्मल सिंगबरोबर 587 धावांची सलामी भागीदारीही केली होती.
-त्याने विजय मर्चंट ट्रॉफीमध्येही 16 वर्षांखालील पंजाब संघाकडून पदार्पणाच्या सामन्यातच द्विशतक केले होते.
– त्याने 19 वर्षाखालील संघाकडून केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला 2018 च्या आयपीएलमध्ये कोलकता नाईट रायडर्स संघाने 1.80 कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतले.
– मागीलवर्षी भारतीय अ संघातही स्थान मिळवले. या संघाकडूनही खेळताना त्याने चांगली कामगिरी केली आहे.
– सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतही त्याने 9 डावात 104 च्या सरासरीने 728 धावा केल्या आहेत. यात त्याने तमिळनाडू विरुद्ध मोहालीत 268 धावांची द्विशतकी खेळी केली.
– त्याला बीसीसीआयने 2013-14 आणि 2014-15 मध्ये सर्वोत्तम ज्यूनियर क्रिकेटपटूचा पुरस्कारही दिला होता.
-त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 9 सामन्यात 77.28 च्या सरासरीने 1089 धावा केल्या आहेत. तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 36 सामन्यात 47.78 सरासरीने 1529 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माने विव रिचर्ड्स यांचा विक्रम मोडला
–रोहित शर्मा शिकतोय शिखर धवनच्या मुलीकडून डान्स, पहा व्हिडिओ
–त्या एका चेंडूमुळे भारताला सिडनी सामना गमवावा लागला…