दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकाने दमदार कामगिरी केली आहे. श्रीलंकेला ३९६ धावांवर सर्वबाद केल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ६०० पेक्षा अधिक धावा करत मोठी आघाडी मिळवली आहे. यात दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसचे मोठे योगदान राहिले. मात्र त्याचे द्विशतक थोडक्यात हुकले. तरीही कसोटीतील मोठ्या विक्रमाच्या यादीत त्याच्या नावाचा समावेश झाला आहे.
असा झाला १९९ धावांवर बाद
दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात चौथ्या क्रमांकार फलंदाजीसाठी उतरलेल्या फाफ डू प्लेसिसने २७६ चेंडूंचा सामना करताना २४ चौकारांसह १९९ धावांची खेळी केली आहे. मात्र त्याचे पहिले कसोटी द्विशतक केवळ १ धावेने हुकले. पण १९९ ही त्याची सर्वोच्च कसोटी धावसंख्या ठरली आहे. तसेच हे त्याचे कसोटीतील १० वे शतक आहे.
सोमवारी(२८ डिसेंबर) तो १९९ धावांवर असताना डावातील १३८ वे षटकात वनिंदू हसरंगाची गोलंदाजी खेळताना झेलबाद झाला. त्याने या षटकातील पाचव्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र मिड-ऑनला उभा असलेल्या श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेने त्याचा झेल घेतला. त्यामुळे डू प्लेसिसला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
Oh Dear
Faf du Plessis caught at mid-on on 199, cricket bloody hell #BoxingDayTest #SAvSL pic.twitter.com/9J32rokqrF— Mahlatse Mphahlele (@BraMahlatse) December 28, 2020
Faf du Plessis falls for 1️⃣9️⃣9️⃣ 😱
One run short of his maiden Test double hundred, the 🇿🇦 batsman is caught at mid-on off Wanindu Hasaranga.
A disappointing end to a magnificent innings 👏#SAvSL SCORECARD ▶️ https://t.co/5jzy9lhScF pic.twitter.com/eemEd6sJSq
— ICC (@ICC) December 28, 2020
फाफ डू प्लेसिस ठरला अकरावा कसोटीपटू
असे असले तरी, डू प्लेसिस कसोटी क्रिकेटमध्ये १९९ धावांवर बाद होणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत अकराव्या स्थानी विराजमान झाला आहे. याचा अर्थ असा होतो की, डू प्लेसिसपुर्वी तब्बल १० फलंदाजांचे अवघ्या एका धावेमुळे द्विशतक हुकले आहे. सर्वप्रथम पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मुद्दसर नजर यांच्यावर १९९ धावांवर बाद होण्याची वेळ आली होती. २४ ऑक्टोबर १९८४ ला भारताविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात त्यांनी ४०८ चेंडूंचा सामना करत १९९ धावा केल्या होत्या. दरम्यान त्यांनी २४ चौकार लगावले होते.
त्यांच्यानंतर माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (१९८६ वर्ष), ऑस्ट्रेलियन दिग्गज मॅथ्यू एलिऑट (१९९७ वर्ष), माजी श्रीलंकन क्रिकेटपटू सनथ जयसूर्या (१९९७ वर्ष) यांना देखील १९९ धावांवर पव्हेलियनला परतावे लागले होते. त्यांच्या व्यतिरिक्त स्टिव्ह वॉ, युनूस खान, आयन बेल, स्टिव्ह स्मिथ, केएल राहुल, डिन एल्गार यांचाही कसोटीत १९९ धावांवर बाद होणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत समावेश आहे.
😬 Batters who have been dismissed for 199 in Test cricket:
🇵🇰 Muddasar Nazar
🇮🇳 Muhammad Azharuddin
🇦🇺 Matthew Elliott
🇱🇰 Sanath Jayasuriya
🇦🇺 Steve Waugh
🇵🇰 Younis Khan
🏴 Ian Bell
🇦🇺 Steve Smith
🇮🇳 KL Rahul
🇿🇦 Dean Elgar
🇿🇦 FAF DU PLESSIS#SAvSL pic.twitter.com/5UPdVhJaWs— ICC (@ICC) December 28, 2020
कसोटीत १९९ धावांवर बाद होणारे क्रिकेटपटू
मुद्दसर नजर- पाकिस्तान विरुद्ध भारत (वर्ष १९८४)
मोहम्मद अझरुद्दीन- भारत विरुद्ध श्रीलंका (वर्ष १९८६)
मॅथ्यू एलिऑट- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (वर्ष १९९७)
सनथ जयसुर्या- श्रीलंका विरुद्ध भारत (वर्ष १९९७)
स्टिव्ह वॉ- ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज (वर्ष १९९९)
युनूस खान- पाकिस्तान विरुद्ध भारत (वर्ष २००६)
आयन बेल- इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (वर्ष २००८)
स्टिव्ह स्मिथ- ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज (वर्ष २०१५)
केएल राहुल- भारत विरुद्ध इंग्लंड (वर्ष २०१६)
डिन एल्गार- दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांग्लादेश (वर्ष २०१७)
फाफ डू प्सेसिस- दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका (वर्ष २०२०)
महत्त्वाच्या बातम्या-
क्या बात अज्जू! ‘जॉनी मुलाघ मेडल’ जिंकणारा अजिंक्य रहाणे ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू
सगळ्या धावा एकीकडे आणि ती एक धाव एकीकडे! रहाणेने घेतलेली विजयी धाव ‘या’साठी आहे खास
मेलबर्न कसोटीतील ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाची भरारी, इंग्लंडला पछाडत मिळवलं ‘हे’ स्थान