शुक्रवारी (२ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीग २०२०चा १४वा सामना पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात हा सामना खेळण्यात आला. दोन्ही संघाचा हा या हंगामातील चौथा सामना होता.
या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत सुरुवातीला फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे संघाची ठरलेली सलामी जोडी, डेविड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो मैदानावर उतरले. पण पहिल्याच षटकात चेन्नईचा गोलंदाज दिपक चाहरने बेयस्टोला तंबूचा रस्ता दाखवला. असे असले तरी, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मनिष पांडे आणि वॉर्नरने मिळून संघाचा डाव सांभाळला.
वॉर्नर फटकेबाजी करत संघाचा डाव एका बाजूने पुढे नेत होता. तेवढ्यात, सामन्यातील ११वे षटक टाकण्यासाठी पियूष चावला आला. त्याने षटकातील ५वा चेंडू टाकला आणि वॉर्नरने त्या चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवण्याच्या प्रयत्नात दमदार शॉट मारला. परंतु, सीमारेषेजवळ उभा असलेल्या फाफ डू प्लेसिसने हवेत ऊंच उडी घेत अप्रतिम झेल पकडला. सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये बसलेले हैदराबाद संघाचे खेळाडू, इतर कर्मचारी डू प्लेसिसचा तो अप्रतिम झेल पाहून दंग झाले.
वॉर्नरच्या रुपात हैदराबाद संघाने त्यांची तिसरी विकेट गमावली. तो २९ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २८ धावा करत पव्हेलियनला परतला.
https://twitter.com/TheIndianBunny/status/1312047326978924545
One more flying catch by Faf Du Plessis so far in this Season , It was the most important wicket of warner#CSKvSRH #WhistlePodu 💪 pic.twitter.com/tLWOlptkDs
— Dhoni Fans Army (@itsDhoniArmy) October 2, 2020
https://twitter.com/iplvideos_/status/1312051113651130368
https://twitter.com/AdityaS_Indian/status/1312052962412253184
https://twitter.com/watsonmpaul/status/1312044584134942725?s=20
Bande mai ..alag level ki dedication hai saahab#fafduplessis #CSK #SuperMan #CSKvSRH #SRH pic.twitter.com/pF4oUGHtYj
— π🦁 (@IAmIndianHitler) October 2, 2020
https://twitter.com/razz_sanjeet/status/1312048370077233157
https://twitter.com/Intrepid_SK/status/1312047231655047170
https://twitter.com/grjain/status/1312044638962814977
अनेक चाहत्यांनी डू प्लेसिसचा झेल पकडतानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे आणि त्याच्यावर कौतुंकाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने तर, “बंदे मे अलग लेव्हल की डेडिकेशन है साहब,” अशा शब्दात डू प्लेसिसची प्रशंसा केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“माझा विक्रम तू मोडलास…”, धोनीने आयपीएलमधील मोठा विक्रम नावावर केल्यानंतर ‘त्या’ खेळाडूचे ट्विट
आयपीएलने शिकवलं आता गाजवतायत जग; ‘या’ दोघांच्या शतकी भागिदारीचे सर्वत्र होतंय कौतुक
ट्रेंडिंग लेख-
‘बिग टॉम’ बिरुदावली लाभलेले टॉम मूडी म्हणजे ‘दर्जेदार खेळाडू आणि असामान्य प्रशिक्षक’
‘या’ तीन कारणांमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबला पाहावे लागले पराभवाचे तोंड
गळ्यात २५ तोळ्याची सोन्याची चैन घालून गोलंदाजी करणारा भारताचा प्रविण कुमार