---Advertisement---

… अन् चाहत्यांच्या काळजात झाले चर्र! फाफ आणि मुस्तफिजुरमध्ये जोराची धडक, मैदानावरच लागले विव्हळू

On: रविवार, ऑक्टोबर 3, 2021 7:14 AM
---Advertisement---

शनिवारी (२ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ मधील दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स असा रंगला. उच्च धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात राजस्थानने १९० धावांचे आव्हान सहजरीत्या पार करत प्ले ऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, सामन्यादरम्यान अशी एक घटना घडली, ज्यामुळे अनेक चाहत्यांच्या काळजात धस्स झाले.

अशी घडली घटना
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड व फाफ डू प्लेसिस यांनी संघाला शानदार सुरुवात दिली. पावर प्लेमधील अखेरचे षटक सुरू असताना राजस्थानचा गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याने टाकलेला चेंडू प्लेसिसने लॉंग ऑफच्या दिशेने मारला. त्याचवेळी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो रहमान याला जाऊन धडकला. ही टक्कर अत्यंत जोरदार होती. त्यामुळे चेन्नईच्या फिजीओला मैदानात यावे लागले. त्याने फाफची थोडीफार तपासणी करून त्याच्या मानेला मसाज दिला. त्यापुढील षटकात प्लेसिस २५ धावा करून राहुल तेवतियाच्या चेंडूवर बाद झाला.

दुखापतीतून सावरत आहे प्लेसिस
सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असला तरी प्लेसिस एका मोठ्या दुखापतीतून नुकताच बाहेर आला आहे. यावर्षी पाकिस्तान सुपर लीगच्या एका सामन्यात वेगवान गोलंदाज नसीम शाह याच्या गोलंदाजीवर फलंदाजी करत असताना एक वेगवान चेंडू प्लेसिसच्या हेल्मेटवर लागला होता. त्यानंतर त्याला कन्कशनमुळे बराच काळ मैदानाबाहेर राहावे लागले होते. पीएसएल, द हंड्रेड व कॅरेबियन प्रीमियर लीगच्या काही सामन्यांना तो मुकला होता.

https://twitter.com/Cricsphere/status/1444317987041779720?t=D79Qp2CYGMCDv_FTHOmJRg&s=19

राजस्थानचा राजेशाही विजय

अबुधाबी येथे झालेल्या सामन्यात चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने नाबाद शतक झळकावत व इतर फलंदाजांनी उपयुक्त योगदान देत चेन्नईची धावसंख्या १८९ पर्यंत नेली. प्रत्युत्तरात, एविन लुईस व यशस्वी जयस्वाल यांनी संघाला ७७ धावांची वेगवान सलामी दिली. त्यानंतर, चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या शिवम दुबे याने नाबाद ६४ धावा बनवत संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर पुरस्कार ऋतुराज गायकवाड याला देण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---