---Advertisement---

चेन्नई सुपरकिंग्सचा हा दिग्गज खेळाडू दुसऱ्यांदा झाला पिता

On: शुक्रवार, ऑगस्ट 21, 2020 12:59 PM
---Advertisement---

मुंबई । इंडियन प्रीमियर लीग 2020 सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज फाफ डू प्लेसिसला चांगली बातमी मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा माजी कर्णधार दुसऱ्यांदा वडील बनला आहे. मंगळवारी डू प्लेसिसची पत्नी इमारीनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. डू प्लेसिसने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली.

डू प्लेसिस आणि इमारी यांचे 7 वर्षांपूर्वी 2013 मध्ये लग्न झाले होते. त्यांनतर त्यांना पहिली मुलगी झाली होती. तिचे नाव एमिली आहे, तर नुकत्याच जमलेल्या  दुसऱ्या मुलीचे नाव त्यांनी जोये ठेवले आहे.

फाफ सध्या क्रिकेटपासून दूर आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने आयोजित केलेल्या शिबिरामध्येही तो सहभागी झाला नाही. आयपीएलमध्येही तो थोडा उशिरा चेन्नई संघात सामील होईल, असे बोलले जात आहे. कारण सध्या तो त्याच्या कुटुंबासमवेत आहे.

https://www.instagram.com/p/CEHBoEjHoqu/?utm_source=ig_web_copy_link

फाफ डू प्लेसिसची पत्नी इमारी ही दक्षिण आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक अलायन्स या राजकीय पक्षातील खासदार करीनची मुलगी आहे. ती स्किन टेक्नोलॉजी कंपनीत सहाय्यक म्हणून काम करते. इमेरीला फोटोग्राफी अाणि फिरायला आवडते.

इमारी ही तिच्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे. ती कर्करोगाविरूद्ध जागरूकता निर्माण करण्याचे काम करते. त्या व्यतिरिक्त ती दक्षिण आफ्रिकेतील बलात्कार पीडितांना आर्थिक मदत देणाऱ्या संस्थामध्ये काम करते.

महत्त्वाच्या बातम्या-

-चेन्नई सुपरकिंग्सचा हा दिग्गज खेळाडू दुसऱ्यांदा झाला पिता

-इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी बदलला जाणार आयपीएलचा नियम?

-विराटच्या आरसीबीसेनेचा प्लॅन तयार; ‘या’ दिवशी होणार यूएईला रवाना

ट्रेंडिंग लेख-

-जगभरात भारतासारखे क्रिकेट वेडे फॅन्स शोधून सापडणार नाहीत, जाणून घ्या या पाठीमागची ५ कारणं

-मुंबई- चेन्नईपुर्वीच आयपीएलचे हे ३ संघ दुबईत दाखल, ६ दिवस होणार क्वारंटाईन

-खेलरत्न पुरस्कारासाठी पात्र होते हे ४ भारतीय दिग्गज क्रिकेटर, पण नाही मिळाला हा सन्मान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---