शुक्रवारी ( १५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ आमने-सामने होते. या रोमांचक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर चेन्नई सुपर किंग्स संघाकडून फाफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. दरम्यान तुफानी अर्धशतक झळकावणाऱ्या फाफ डू प्लेसिसच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय चेन्नई सुपर किंग्स संघाच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून देत चुकीचा ठरवला होता.चेन्नई सुपर किंग्स संघाकडून ऋतुराज गायकवाडने ३२ धावांची खेळी केली. तर फाफ डू प्लेसिसने तुफान फटकेबाजी करत ८६ धावांची खेळी केली. या खेळी सह त्याने आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्वोच्च धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ६ वे स्थान पटकावले आहे.
फाफ डू प्लेसिसने ५९ चेंडूंचा सामना करत ७ चौकार आणि ३ षटकारांचा साहाय्याने ८६ धावा केल्या होत्या. या यादीत सर्वोच्च स्थानी शेन वॉटसन आहे, ज्याने २०१८ मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात नाबाद ११७ धावांची खेळी केली होती. तर वृद्धीमान साहाने २०१४ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत नाबाद ११५ धावांची खेळी केली होती. तसेच मुरली विजयने २०११ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत ९५ धावा केल्या होत्या.
आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
११७* धावा – शेन वॉटसन, २०१८
११५* धावा – वृद्धिमान साहा, २०१४
९५ धावा – मुरली विजय , २०११
९४ धावा – मनीष पांडे, २०१४
८९ धावा – मनविंदर बिस्ला, २०१२
८६ धावा – फाफ डू प्लेसिस, २०२१*
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ मध्ये ऋतु’राज’! मायकल हसीनंतर ‘ही’ कामगिरी करणारा दुसराच फलंदाज
ऋतु आणि फाफने केले आयपीएल २०२१ वर ‘राज’; विराट-एबीशी केली बरोबरी






